नवीन कॉम्प्युटर घेताना कोणता घ्यावा, कसा घ्यावा संपूर्ण महिती

               नवीन कॉम्पुटर घेताना काय बघावे.

             नवीन कॉम्पुटर घेताय थांबा आधी हे वाचा...,

                   आताच्या जगात जर का आपण नवीन कॉम्पुटर घेताय तर सगळ्यांना एक प्रश्न पडतो नवीन कॉम्पुटर घेताना त्यातील Operating System, RAM, Processor, etc कोणते असावे. साधारणतः हा प्रश्न सगळ्यांना पडतो, व साधारण लोकांकडून महाग वस्तू हे परत परत घेतले जात नाही व मला पण खूप जन विचारता कॉम्पुटर घेताना कि आम्ही कोणता PC घेऊ व मला हा प्रश्न महत्वाचा वाटला म्हणून मी ही पोस्ट लिहित आहे कारण हा प्रश्न विचारायला जितका साधा आहे पण त्याच उत्तर हे एका शब्दात नाही देता येत मला तरी वाटते ह्या प्रश्नाच उत्तर आयुष्यात सगळ्यांनाच कामात पडेल.
              


          सगळ्यांनाच अजून एक प्रश्न पडतो तो म्हणजे Desktop घ्यावे की Laptop  

१. Desktop की Laptop :

          नवीन कॉम्पुटर घेताना हा विचार पण सगळे जन करतात की Desktop घ्यावे की Laptop. तुम्ही जर का कोणाला विचारल तर तो त्याच्या आवडीनुसार सांगतो कि Desktop चांगला असतो तर कोणी सांगत कि Laptop मस्त असतो. व ही वस्तू अशी असते कि सामान्य माणसाकडून परत-परत घेतली जात नाही. व कॉम्पुटर च्या बाबतीत तुम्ही पण अश्या विचारात असाल, तर त्यामध्ये तुम्ही हे बघा की तुम्ही कॉम्पुटर चा उपयोग कश्यासाठी करणार आहे. जर का तुम्हाला मोठा Data कुठे घेऊन जायचं वेळोवेळी काम पडत असेल, व तुम्ही अश्या कुठल्या कंपनी मध्ये असाल जिथे तुम्हाला Documents अथवा Presentation घेऊन जायचं गरज पडते. तर तुमच्या साठी Laptop बेस्ट आहे अन जर का तुम्हाला असा मोठा Data कुठे घेऊन जायची गरजच नाही पडत तर तुम्ही Desktop घेऊ शकता. अन आताच्या जगात Android Technology मुळे मोबईल हे Laptop चे काम सहज करत आहे Laptop ची जागा हे Android Smartphone घेत असल्यामुळे मी माझ्या वाचकांना Desktop घेण्याचाच सल्ला देईल. जर का तुम्ही अशी कोणती वस्तू घेत असाल तर आपण त्यामध्ये आपली पण आवड बघावी.

  
      


           विविध कामासाठी कोणते कॉम्पुटर घ्यावे. हे पुढे सांगितले आहे.

२. Computer Processor :

              Processor हे कॉम्पुटर चा महत्वाचा पार्ट ( ब्रेन ) आहे. अन जर का तुम्हाला Fast कॉम्पुटर घ्यायचं असाल तर चांगला वाला Processor घेणे कधीही योग्यच. 
         खाली तुम्हाला Processor ची माहीती देत आहे. अन चांगल्या Processor मध्ये इंटेल चे Processor चांगले आहेत. 
    
      

 

    Dual Core – 

             जर का तुम्हाला घरगुती कामासाठी नवीन कॉम्पुटर घ्यायच असेल तर तुमच्या साठी ह्या Processor वाला कॉम्पुटर चांगला आहे. 

    i3 –

          तुम्ही घरगुती कामासोबतच Office चे काम पण करत असाल. व थोडीफार कमी ग्राफिक वाले Games खेळण्यासाठी हा i3 चा Processor चांगला आहे. 

    i5 –

          जर का तुमचे कुठले शॉप आहे. Video Editing , Photoshop, असे प्रकारचे Software तुम्ही वापरणार असाल व तुम्हाला High Quality, High ग्राफीक्स Games खेळण्याची तुम्हाला आवड असेल तर तुम्ही i5 Processor घेऊ शकता ह्या प्रकारचा Processor अश्या कामासाठी चांगला असतो. 

    i7 –

          ‘ i7 ’ ह्या प्रकारच्या Processor असलेल्या कॉम्पुटर मध्ये तुम्ही सर्व कामे हे Professionaly करू शकता
    

     टीप : (वाचाकानो बदलत्या आपल्या जीवनात Technology पण खूप Update होत आहे. अजून आहेत असे खूप Processor पण वर सांगितले Processor सर्वात बेस्ट आहेत. व जस-जशी Technology अपडेट होत आहे तस-तसे अजून खूप Processor येत राहतील. याचे पण आपण भान ठेवावे)
   ३. RAM (Random Access Memory) :

          Generally सर्वाना माहीती आहे की RAM ही Gigabites मध्ये मोजता. जास्त RAM असलेला कॉम्पुटर हा आपण जर का कोणती File Save करत असलो तर त्याची स्पीड RAM Mainten करते. RAM मध्ये तात्पुरता स्वरुपात Data किंवा File आपण Save करू शकतो. त्यासाठी योग्य RAM निवडणे कधीही योग्यच.
         
          


          2GB RAM : 

                    नॉर्मली वापरासाठी आपण अश्या प्रकारची RAM असलेला कॉम्पुटर घेऊ शकतो— For –Dual Core 

          4GB RAM :

                    i3 व i5 अश्या Processor साठी तुम्ही 4GB RAM असलेला कॉम्पुटर घेऊ शकता.

          8GB RAM : 

                   8GB RAM तुम्ही i7 व येणाऱ्या अजून पुढच्या Processor साठी पण वापरू शकता.

  (अजून पुढे 16GB RAM पण आताच्या बाजारात उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या आवडी व गरजेनुसार घेऊ शकता.)

४. Hard Drive :

         

    

              आपण जर का कॉम्पुटर वर काम करत आहे. तर काम करत असताना जो Data किंवा File ही RAM मध्ये तात्पुरत्या स्वरुपात Save होत असते व काम झाल्यावर ती File किंवा Data ला Permenant साठी सेव्ह करण्यासाठी Hard Drive ची गरज असते. ही Hard Drive किती GB किंवा किती TB मध्ये घ्यावी हे आपल्या कामावर अवलंबून असते. तसे तुम्ही 300GB, 500GB, 1 TB, इत्यादी प्रकारच्या साईज मध्ये Hard Disk/Drive घेऊ शकता.  
 

 ५. Operating System :

                

              आता सगळ्यांना हा पण महत्वाचा प्रश्न वाटतो की कॉम्पुटर घेत तर आहे, पण यामध्ये Operating System कोणती घ्यावी, तर ह्या मध्ये घाबरण्याच काहीच कारण नाही तुम्हाला जी Operating System वापरता येत असेल सरळ ती Operating System तुम्ही घेऊ शकता. कारण Operating System च काम फक्त Software किंवा कॉम्पुटर System चालवणे हेच महत्वाच काम असत. फक्त तुम्ही घेत असलेली System ही तुम्हाला वापरता येते कि नाही हे महत्वाच आहे.
         
            


          बाकी ह्या कॉम्पुटर क्षेत्राशी जो निगडीत आहे तो बरोबर त्याच्या कामात येणारी Operating System निवडतो. 


 ६. ग्राफिक्स कार्ड कोणते घ्यावे : 

           घरगुती काम करण्यसाठी जर का तुम्ही कॉम्पुटर घेत असाल तर तुम्हाला माझ्या मते ग्राफिक्स च काही काम नाही पडणार अन जर का तुम्ही High ग्राफिक्स Games, हेवी Software जसे की- Video Editing, Animation बनवण्यासाठी किंवा फोटो एडिटिंग साठी लागणारे Software चा तुम्ही उपयोग करणार असणार तर तुम्हाला ग्राफिक्स ची गरज लागेल. जर का तुम्ही अश्या कामासाठी ग्राफिक्स कार्ड नाही वापरलं तर तुम्ही वापरत असलेले Software योग्य प्रकारे चालणार नाही, Games खेळत असतील तर ते अडकतील, इत्यादी प्रकारचे प्रोब्लेम येतील

          

     
              AMD अन NVIDIA ग्राफिक्स कार्ड हे सध्या बाजारात चर्चेत आहे. AMD यांचे Processor पण आहेत. जर का तुम्हाला ग्राफिक्स कार्ड घ्यायचं असेल तर मी तुम्हाला NVIDIA च ग्राफिक्स कार्ड चांगल असत हेच सांगेल. 

        (जर का तुम्हाला कॉम्पुटर Assmble करून घ्यायचं असेल तर तुम्ही तुमच्या उपयोगानुसार पार्ट निवडू शकता व तुम्हाला हवा तसा कॉम्पुटर तयार करून मिळतो व याची किंमत पण कमी पडते.) मला Instagram Follow करण्यासाठी खाली माझ्या नावावर क्लिक करा.


                                                 लेखक : भुषण सावंदे

Post a Comment

1 Comments