Types Of Drills And Drilling Uses - Learn Here

 प्रस्तावना (Introduction)  :-  

        
            Drill हा एक कटींग टूल आहे. याच्या सहाय्याने जॉबवर छिद्र (Hole) पाहण्याची क्रिया होते. याचा उपयोग हिलीग मशिनच्या सहाय्याने करतात. ड्रिलींग करताना ड्रिल हे गोलाकार फिरून खालील दिशेने दिलेल्या दाबाच्या सहाय्याने मटेरिअल मध्ये घुसत असत. Types Of Drills And Drilling Uses - Learn Here All Knowledge In Mechanical Engineering By Life Style Knowledge Hub.types of drills and drilling uses - learn Hereमटेरियल (Material) :- 


           ड्रिल हे हायकार्बन स्टिल व हाय स्पिड स्टिल पासुन बनवतात. मऊ धातूसाठी हायकार्बन स्टिलचे ड्रिल वापरतात व कठीण धातूसाठी हाय स्पिड स्टिल चे ड्रिल वापरतात. 

प्रकार (Types) :- कामानुसार रचनेनुसार ड्रिलचे पुढील प्रकार पडतात.

1) फ्लॅट ड्रिल (Flat Drill) :- हे ड्रिल हायकार्बन स्टिल पासून बनवतात. याची बॉडी गोल असून एक बाजू चपटी केलेली असते. चपटया बाजुला 90° कोनात ग्राईंडींग करुन हार्डनींग व टेम्परींग करतात. याच्या कटींग एजला 3' ते 5' चा अॅन्गल देतात. कारपेन्टरी विभागात याचा उपयोग करतात. धातू मध्ये याचा उपयोग जास्त करून करत नाही कारण -
A) योग्य साईजचे डिल होल होत नाही.
B) कापलेल्या चिप्स बाहेर निघत नाहीत .
C) कुलंट ड्रिल पॉईन्ट पर्यन्त पोहचत नाही.
D) ड्रिल पॉईन्ट वारंवार ब्लंट [धार जाणे] होतो.
E) ग्राईंडींग केल्यावर साईज कमी होते.

2) फ्ल्युटेड ड्रिल्स (Fluted Drill):- याच्या सहाय्याने अॅक्युरेट ड्रिल होल होते. जास्त स्पिडवर चालते वरुन याचे पुढील दोन प्रकार पडतात. 

A) स्ट्रेट फ्ल्युटेड ड्रिल (Stright Fluted Dril):- फ्लैट ड्रिल याच्या बॉडीवर अॅक्सीसच्या समांतर सरळ फ्ल्यूटेड असतात. मोठे जॉबवर ड्रिलींग करतांना त्यामधील चिन सहज बाहेर येत नाही. चिप्स बाहेर काढतांना तिला वारंवार बाहेर काढावे लागते. म्हणून वर्कशॉपमध्ये हे ड्रिल कमी प्रमाणात वापरले जाते.

B) ट्विस्ट फ्ल्युटेड ड्रिल (Twist Fluted Drill) : - या प्रकारच्या ड्रिलच्या बॉडीवर फ्ल्युट हे टिवस्ट मध्ये [पिळलेल्या स्वरुपात) मध्ये पाडलेले असतात म्हणून या ड्रिलला टिवस्ट ड्रिल म्हणता या ड्रिलमुळे
A) कापलेल्या चिप्स सहज बाहेर निघतात 
B) कुलंट ड्रिलच्या पॉईन्ट पर्यन्त पोहचते
C) ड्रिल जास्त स्पिडवर चालवता येते
D) ड्रिलहोल हे अॅक्युरेट येते म्हणून हे ड्रिल वर्कशॉपमध्ये जास्त प्रमाणात वापरले जाते.

टिवस्ट डिल चे भाग (Parts of Twist Drill):


1) शॅन्क (Shank):- 

          हा टिवस्ट ड्रिलच्या बॉडीचा वरील भाग असतो. याच्या सहाय्याने ड्रिल हे मशिन स्पिन्डल मध्ये किंवा ड्रिल चक मध्ये पकडले जाते. हे दोन प्रकारचे असतात. मोठया व्यासाच्या ड्रिलसाठी टेपर शॅन्क व लायन व्यासाच्या ड्रिल साठी स्ट्रेट शॅन्क वापरतात.


 2) नेक (Neck) :-

             हा ड्रिलच्या शॅन्क व बॉडी मधील भार असतो. याला रिसेस सुध्दा (Recess) म्हणतात, नेकवर दिलची साईज कंपनी मार्क व दिलचे मटेरिअल लिहलेले असते.


3) बॉडी (Body) :- 

            हा ड्रिलच्या पॉईन्ट व शॅन्क मधील भाग असतो. यावर फ्ल्युट कापलेले असतात. फ्ल्युट, लॅन्ड भाजीन, बॉडी क्लिअरन्स आणि वेब हे बॉडीचे वेगवेगळे भाग आहेत.

types of drills and drilling uses - learn Here
4) पॉईंट (Point) :- 

            हा ड्रिलचा सर्वात खालचा भाग असतो. हा कोनिकल (शंकू) आकाराचा असतो. हा कापण्याची क्रिया करतो. यावर डेड सेंटर, लिप किंवा कटींग एजेस आणि हिलचा समावेश होतो.


5) लँड किंवा मार्जिन (Land Or Margin) :- 

         ही फ्ल्युटसच्या पूर्ण लांबीवर असणारी अरुंद पटटी होय. लॅन्ड / मार्जीन सह ड्रिलचा व्यास मोजतात.


6) बॉडी क्लिअरंस (Body Clearn) :- 

        हा लॅन्ड / मार्जीन च्या खालील छोटया व्यास भाग असतो. यामुळे बॉडीला क्लिअसन्स मिळतो व ड्रिलींग करतांना होल आणि ड्रिल यामधील घर्षण कमी होते.


7) फ्ल्युटस (Flutes) :- 

        फ्ल्युटस म्हणजे ड्रिलच्या लांबीवर असणारे नागमोडी गाळे होय. फ्ल्युटसमुळे कटींग ऐजेस तयार होतात. चिपस तुकडे होवून ते बाहेर सहजपणे येतात कटींग एजपर्यंत कुलंट पोहचते.


8) लिप्पा (Lips):- 

         हा सर्वात खालील भाग होय. कटलिप्स बनतात. यामुळे कटींग एजेंस तयार होतात.


9) लिप क्लिअसन्स (Lip Clearance):-

        ड्रिलच्या कटींग एजचा मधील भाग हा टेपर मध्ये ग्राइंडींग केला जातो. हा 12 ते 15' त ठेवतात.


10. वेब (Web):-

         हा ड्रील च्या दोन फ्ल्युटस मधील भाग असतो. हा दोन फ्ल्युटस वेगवेगळ्या करतो. याची जाडी पॉईटपासुन शकच्या दिशेने हळूहळू वाढत जाते. हा भाग ड्रिलला मजबुत बनवण्यासाठी सहकार्य करता.


11) डेड सेन्टर (Dead Center):-

        याला चिझल एज सुध्दा म्हणता. हा ड्रिलचा सर्वात खालील भाग असतो. कटींग अँगल तयार झाल्यानंतर डेड सेन्टर दोन्ही कटींग ऐजच्या मध्ये तयार होतो. ड्रिलींग करताना सेन्टर पंचने केलेल्या पंचीगवर हा बसतो.


12) टॅग (Tang) :- 

        टिवस्ट ड्रिलच्या शन्कच्या सर्वात वरील भागाला टॅग म्हणतात. हा चपटा (Flat) असतो. हा चपटा असल्यामुळे ड्रिल मशीन स्पिंडल मध्ये ड्रिल फिट होतो. ड्रिल फिट होतो व तो निघत नाही. व स्लिप होत नाही.Related Articles :- 


ड्रिलचे विविध कोन (Various Drill Angles) :- ड्रिलींग करतांना ड्रिलच्या पॉईंटची विविध कोन असतात ते पुढीलप्रमाणे :1) कटींग अॅन्गल (Cutting Angle) :- 

         हा ड्रिलचा पॉईंट अॅन्गल असतो. तो 60 ते 150° कामानुसार व मटेरिअलनुसार ठेवला जातो. कठीण धातूला जास्त व मऊ धारला कमी अॅन्गल ठेवला जातो. सर्वसाधारण कामासाठी हा 118' असतो. याला पॉईन्ट अॅन्गल किंवा लिप अॅन्गल असे म्हणतात.


2) क्लिअरन्स अॅन्गल (Clearnce Angle) :- 

         लिप क्लिअरन्स अॅन्गल हा अॅन्गल लिपला क्लिअरन्स देण्यासाठी बनविला जातो. कामानुसार हा 7' ते 15 पर्यंत ठेवतात. हा कोन कठीण धातूला कमी व मऊ धातूला जास्त ठेवतात. हा कोन कठीण धातूला कमी व मऊ धातूला जास्त ठेवतात. साधारण कामासाठी हा कोन 12° ते 15° ठेवतात.


 3) हेलीक्स अॅन्गल (Helix Angle) :-  

       ड्रिलवर फ्ल्युट ज्या कोनात बनलेले असतात त्याला हेलीक्स अॅन्गल म्हणतात. या कोनाला बदलता येत नाही. भारतीय स्टॅन्डर्डनुसार (B.I.S.) खालील प्रकारचे ड्रिल मिळतात.
A) टाईप 'H' :- या प्रकारात ड्रिलचा हेलीक्स अॅन्गल 10 ते 13° पर्यंत असतो. व हे लो कार्बन स्ट्रिलवर वापरतात. 
B) टाईप 'N' :- या प्रकारात ड्रिलचा हेलीक्स अॅन्गल 15' ते 16° पर्यंत असतो. याचा उपयोग हार्ड धातूवर करतात.
 C) टाईप 'S' :- या प्रकारात ड्रिलचा हेलीक्स अॅन्गल 35° ते 40° पर्यंत असतो. याचा उपयोग सॉफ्ट आणि टप धातूवर करतात.


4) रेक अॅन्गल (Reke Angle) :- 

       ड्रिलचा कटींग सरफेस आणि फेस ची स्पर्शरेषा यामधील कोनास रेक अॅन्गल म्हणतात. या कोनामुळे चिप्स ब्रेक होतात. त्यामुळे कटींग • सहज होते. हा अॅन्गल सेंटर पासून परिघाकडे वाढत जातो.. हा अॅन्गल 0° ते 25° - 30° पर्यंत असतो.


5) चीजल एज अॅन्गल (Chisel edge Angle) :-

    हा कोन ड्रिलचा चिजल एज आणि कटींग लिप्स यामधील असतो. हा 120 ° - 135° पर्यंत असतो. 

   वेगवेगळ्या धातूंचे कटींग आणि क्लिअरनस अॅन्गल (Cutting & Clearance Angle of Various – Metals) :

क्र. धातू कटींग अॅन्गल

1. कठीण धातू जसे हाय कार्बन स्टील -                                       150°
2. मध्यम धातू जसे ड्रॉ फोर्ज स्टील -                                         125°
3. सर्व साधारण धातू जसे माईल्ड स्टील  - 118 °
4. पितळ आणि तांबे -                                                              100°
5. मऊ धातू जसे कास्ट आयर्न, ॲल्युमिनीअम  - 90°
6. लाकूड, बँकेलाईट  - 60°

शॅन्कचे प्रकार (Types of Shank) :


१)स्ट्रेट शॅन्क (Straight Shank) :- 

       या प्रकारची शन्क • साईजच्या ड्रिलवर वापरली जाते. हे ड्रील छोटया चकमध्ये फिट करुन ड्रिल न चक मशीन स्पिंडलमध्ये फिट करतात. उदा. 1.00 मीमी ते 12.00 मीमी.


२) टेपर शॅन्क (Taper Shank) :-

      या प्रकारची शन्क मोठ्या साईजच्या ड्रीलवर वापरली जाते. या टेपर शन्क डीलला डायरेक्ट मशीन स्पिंडलमध्ये फिट करून उपयोगात आणतात. ड्रिलच्या मागे जी टेपर शॅन्क असते. तिला मोर्स टेपर शॅन्क म्हणतात. (M.T.)

टेपर शॅन्क ड्रील व त्यांचे मोर्स टेपर (M. T.) नंबर
ड्रिलची साईज मीमी साईजमध्ये (M.T.) नंबर
3.00 - 14.00

14.25 - 23.00
1
23.50 -31.50
2
32.00 – 50.00
3
50.00 – 76.50
4
77.00 – 100.00
5
3.00 - 14.00
6


३) स्कवेअर टेपर(squre Taper Shank) :- 

      या प्रकारची शॅन्क चौकोनी असते आणि वरील बाजूने टेपर असते. या प्रकारची शॅन्कचा उपयोग V रॅचेट ब्रेस ड्रील मशीन द्वारे केला जातो.

ड्रिलच्या साईज (Size of Drill) : 

ड्रिलच्या व्यासनुसार / साईजनुसार त्याचे विविध प्रकार पडतात ते पुढील प्रमाणे

1) फ्रॅक्शन ड्रिल (Fraction Drill) :- हे ड्रिल इंचात मिळतात. हे 1/64" पासून 1" पर्यंत 1/64" च्या फरकाने मिळतात. जसे 1/16", 1/32", 3/64", इ. 1" च्या वरील साईज 1/32", फरकाने मिळतात. जसे 1", 1-1/32", 1 1/16" इत्यादी

2) स्क्वेअर टेपर शॅन्क (Squre Taper Shank) :- या प्रकारची शन्क चौकोनी असते आणि वरील बाजूने टेपर असते. या प्रकारची शॅन्कचा उपयोग V रॅचेट ब्रेस ड्रील मशीन द्वारे केला जातो.


ड्रिलच्या साईज (Size of Drill) :-

            ड्रिलच्या व्यासनुसार / साईजनुसार त्याचे विविध प्रकार पडतात ते पुढील प्रमाणे - 1) फ्रॅक्शन ड्रिल (Fraction Drill) :- हे ड्रिल इंचात मिळतात. हे 1/64" पासून 1" पर्यंत 1/64" च्या फरकाने मिळतात. जसे 1/16", 1/32", 3/64". इ. 1" च्य वरील साईज 1/32". फरकाने मिळतात. जसे 1", 1-1/32", 1 1/16" इत्यादी


3) मेट्रिक ड्रिल (Metric Drill ):- हे ड्रिल मि. मी. मध्ये मिळतात. हे 0.5 मि.मी. ते 10.00 मि.मी. पर्यंत 0.1 मि.मी. फरकाने मिळतात. जसे 0.5.0.6.0.7 मि.मी. इ. 10.00 मि.मी. पासून 0.5 मि.मी. च्या फरकाने मिळतात जसे 10.50, 11.00, 11.50 मिमी. इ.


4) नंबर ड्रिल (Number Drill) :- ड्रिल सर्वात मोठे असुन हे ड्रिल 1 ते 80 नंबर चे मिळतात. नंबर 1 चे ड्रिल सर्वात मोठे असून हया ड्रिलचा व्यास 5.791 मि.मी. [0.228'] असतो. व नंबर 80 हे सर्वात लहान असून त्याचा व्यास 0.35 मि.मी. [0.0135"] असतो. या प्रकारच्या ड्रिलच्या साखळीत नंबर ते नंबर यामध्ये एकसारखा फरक नसतो. योग्य व्यासाचे ड्रिल शोधण्यासाठी ड्रिल साईज चार्ट किंवा हॅन्ड बुकचा आधार घ्यावा लागतो नंबर ड्रिल सिरीजला वायर गेज सेरीज असेही म्हणतात.


5) लेटर ड्रिल (Letter Drill):- हे ड्रिल इंग्रजी लेटर A TOZ या लेटर मध्ये मिळतात. A साईजचे ड्रिल सर्वात लहान 0 234" [5.944 मि.मी.] असते आणि Z साईजचे ड्रिल सर्वात मोठे 0, 413 [10.490मि.मी.] असते.
          लेटर ड्रिल व नंबर ड्रिल शृंखलात ड्रिल गेजच्या सहाय्याने ड्रिल चा व्यास ततोतंत मोजता येतो. ड्रिल गेज हा आयताकृती किंवा चौकोनी आकाराचा धातूचा तुकडा असून त्यावर वेगवेगळ्या व्यासाचे होल एक लगत पडलेले असतात.


6) भारतीय स्टॅन्डर्ड ड्रील (Indian Standared Drill):- हे ड्रिल मि. मी. साईजमध्ये मिळतात. व हे भारतीय स्टॅन्डर्ड नुसार (BIS) बनविले जातात. यात स्ट्रेट शॅन्क 0.2 ते 13 मि.मी. पर्यन्त मिळतात व 3 ते 100 मि.मी. टेपर शॅन्क मध्ये मिळतात.


ड्रिल ग्राईंडींग करतांना लक्षात ठेवायचे महत्वाचे मुद्दे (Some Hints For Drill Grinding)

Types Of Drills And Drilling Uses - Learn Here
ड्रिल ग्राईंडींग करतांना खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

1) कटींग एज (Cutting Edge) :

(a) कटींग एजची लांबी सारखी ठेवणे
b] कटींग एजचा कोन अॅक्सीसशी दोन्ही बाजूंनी सारखा ठेवावा साधारण कामासाठी 59° असतो.

2) लिप क्लिअरन्स (Lip Clearance) :- कटींग एजचा मधील भाग धातूनुसार कोनात ग्राईंडींग करावा | कोन 12° ते 15' ठेवावा ] यामुळे कटींग एजला क्लिअरन्स मिळतो. 3) डेड सेंटर (Dead Centre) :- ड्रिल चा वेब टोकाला बारीक व शॅन्ककडे वाढत जाते तेव्हा पॉईन्टकडे ग्राईड करतांना तो बारीक (लहान] ठेवावा.

स्पेशल ड्रिल ( Special Drill)


1) ऑईल टयुब ड्रिल (Oil Tube Drill) - या ड्रिलचा उपयोग जास्त खोलीचे जॉब ड्रिलींग करण्यासाठी होतो. यामध्ये ड्रिलच्या मधोमध पूर्ण लांबीत स्पायरल मध्ये छिद्र बनवलेले असते. यामुळे कटींग एजपर्यंत कुलंट किंवा लुब्रिकट पोहचते व जॉब लवकर थंड होतो. 


2) मल्टी फ्ल्युटेड ड्रिल (Multi Fluted Drill) - या प्रकारच्या ड्रिलमध्ये दोनपेक्षा जास्त फ्ल्युट असतात. फ्ल्युट जास्त असल्यामुळे फिनीशिंग चांगली येते मोठया साईजचे करण्यासाठी आणि फिनीश करण्यासाठी हे ड्रिल वापरतात


 3) स्टेप ड्रिल (Step Drill) - या प्रकारच्या ड्रिल बॉडी वर एकापेक्षा जास्त स्टेप बनवलेल्या असतात आ प्रत्येक स्टेपला कटींग एजेस असतात. जेथे स्टेप डिल कराज्याची आहे. तेथे हे ड्रिल वापरतात. यामुळे ड्रिलीग वेळ वाचतो.


                                        ड्रिल पकडण्याची साधणे (Drill Holding Devices) :-

    
             ड्रिलचा उपयोग करताना त्याला ड्रिल मशीन स्पिंडलमध्ये फिट करून उपयोगात आणतात. ड्रिल शॅन्क वेगवेगळ्या आकारात असते व तिला वेगवेगह साधनाने फिट करतात. ज्या साधनाने ड्रिलला मशिन स्पीडलमध्ये फिट करतात/पकडतात. त्या साधनांना ड्रिल होल्डींग डिव्हायसेस म्हणतात ते पुढीलप्रमाणे.1) ड्रिल चक (Drill Chuck):- 

      ड्रिलींग करतांना स्ट्रेट ड्रिल पकडण्यासाठी ड्रिल चकचा उपयोग करतात. चकमध्ये 3- जॉ असतात. याच्या वरील बाजुने मोर्स टेपर असलेला आर्डर (Arber) असतो. आर्बर मशिन स्पिडमध्ये फिट होतो. खालील भागात तिन जॉ मध्ये ड्रिल चक की च्या सहाय्याने पकडले जाते / फिट केले जाते. ड्रिल चक उघडणे व बंद करणे साठी चक की चा उपयोग होतो.2) स्लीव (Sleeve) :-

        जेव्हा ड्रिल चकची शॅन्क किं ड्रिलची टेपर शॅन्क ही मशिन स्पिंडल पेक्षा लहान असते. तेव्हा स्लिव्हचा उपयोग करतात. स्लिव्हच्या आत मध्ये बाहेरील बाजुने मोर्स टेपर बनवलेले असते. स्लिवच्चा आतील बाजुत ड्रिलची शॅन्क बसते किंवा ड्रिलचकची शक बसते व बाहेरील बाजु डायरेक्ट मशिन स्पिंडल मध्ये फिट होते. स्लिव या विविध साईजमध्ये / नंबर मध्ये मिळतात जसे 0-1, 1-2, 2-3, 3-4, 4-5,5-6 इ. याचा पहिला स्लिव आतील टेपर व दुसरा नंबर बाहेरील टेपर दर्शविते.३)सॉकेट (Socket):- 

        स्लिव सारखाच सॉकेटचा उपयोग हिल पकडण्यासाठी होतो परंतु जेका लिवी शंकवी मशीन स्पिडलच्या शन्कपेक्षा मोठी असते तेव्हा सैटि वापरतात. साकटच्या वरील व बाहेरील भागाचे टेपर है • मशीन स्पिंडल एवढे असते व आतील भागावे टेपर है • मशिन स्पिंडलपेक्षा मोठे असते तेव्हा त्यात मोठ्या साईजचे ड्रिल पकडले जाते.4) ड्रिल ड्रिप्ट की (Drill Dript key): 

        ड्रिल चक. टेपर रॉन्क ड्रिल, स्लिव व सॉकेट मशीन स्पिंडलमधून बाहेर काढण्यासाठी ड्रिल ड्रिप्ट की वापरतात ड्रिल टि की ही माईल्ड स्टीलपासून बनवितात हिला स्पिडल, ● सॉकेट किंवा स्लिव च्या स्लॉट मध्ये टाकून दुसऱ्या बाजुने • हातोडीने हलके ठोकून सहज बाहेर काढता येते

-- वर्क [जॉब] होल्डींग डिव्हायसेस - (Work (Job) Holding Devices --        जॉबचे ड्रिलसह फिरणे थांबवणेसाठी जॉब व्यवस्थितरित्या पकडावे लागतात किंवा क्लॅम्पींग करावे. लागतात. व्यवस्थित काळजी न घेतल्यास जॉबमुळे ऑपरेटरला धोका संभवतो. इतकेच नाही तर त्यामुळे कामाची अचुकता मिळत नाही. आणि ड्रिलसुध्दा तुद शकतो. जॉब व्यवस्थित पकडण्यासाठी विविध साधनांचा उपयोग करतात ते पुढीलप्रमाणे 


1) मशिन व्हाईस (Machine Vice) :-

           बऱ्याच प्रकारचे ड्रिलींग काम करताना मशिन व्हाईसचा वापर करतात ड्रिलींग करतांन मशिन व्हाईसला ड्रिलींग न होणेसाठी जॉबच्या खाली लाकडी ठोकळा लावावा मशिन व्हाईसला मशिन टेबलवर फिट करण्यासाठी TBoll चा वापर करतात. याचे कामानुसार पुढील प्रकार पडतात

types of drills and drilling uses - learn Here (A) प्लेन मशिन व्हाईस (Plain Machine Vice) :- ही एक साधारण व्हाईस आहे. साधारण जॉब पकडणेसाठी। या व्हाईसचा उपयोग करतात.

B) स्वीव्हेल बेस मशिन व्हाईस (Swivel Base Machine Vice) :- ही व्हाईस गोलाकार बेसवर फिट केलेली असते. त्यामुळे कोणत्याही कोनात टेबलला समांतर फिरु शकते.

 C) युनिव्हर्सल मशिन व्हाईस (Universal Machine Vice):- ही व्हाईस मशिन टेबलला समांतर गोलाकार फिरु शकते. त्याचप्रमाणे मशिन टेबलच्या बरोबर कोणत्याही कोनात सेट करता येते. त्यामुळे जॉबवर्क कोनात (तिरपे] ड्रिलींग करता येते.


2) क्लॅम्पस (Clamps) :- 

          ड्रिल मशीनच्या टेबलवर जॉब फिट करण्यासाठी मशिन व्हाईस वापरतात. त्याचप्रमाणे जॉब स्ट्रेप क्लॅम्पसने सुध्दा मशिन टेबलवर फिट करता येतो. स्ट्रेप क्लॅम्प विविध प्रकारात उपलब्ध आहेत. यामध्ये ब्लोट अडकविण्यासाठी छिद्र किंवा स्लॉट तयार केलेला असतो. वर्कशॉपमध्ये प्लेप क्लॅम्प, अॅडजेस्टेबल क्लॅम्प, U क्लॅम्प, गुसनेक क्लॅम्प आणि फिगर क्लॅम्प वापरले जातात.


3) स्टेप ब्लॉक (Step Block) :-

          हा एक प्रकारचा स्टिलचा ब्लॉक असतो. यावर दोनापेक्षा जास्त स्टेप असतो. जेथे वेगवेगळ्या उंचीवर जॉबला क्लॅम्पच्या सहाय्याने फिट करावयाचे असते तेथे वापरतात.


4) व्ही ब्लॉक (V-Block) :-  

      व्हि ब्लॉक जोडीत मिळतात. गोल आकाराच्या जॉबवर ड्रिलींग करतांना त्याला व्हि ब्लॉक मध्ये क्लॅम्प करतात.


5) अॅन्गल प्लेट (Angle Plate):-

                ही इंग्रजी 'L' आकाराची असते. हिच्या दोन्ही बाजुंवर स्लॉट असतात. जे जॉब मशिन व्हाईस आणि स्ट्रप क्लॅम्प ने फिट करता येत नाही ते जॉब अॅन्गल प्लेटमध्ये नट-बोल्टने क्लॅम्प करतात.


6) पॅरेलल्स (Parallels):- 

           हे आयताकृती आकारात स्टिल पासुन बनवतात. याची प्रत्येक बाजु अचुक असते. याचा उपयोग जॉब मशिन टेबलला समांतर लेव्हल मध्ये सेट करण्यासाठी फिट करण्यासाठी करतात.


7) सी क्लॅम्प (C- clamp) :-

          हे इंग्रली C आकाराचे असते. याचा उपयोग ड्रिलींग करतांना दोन किंवा त्यापेक्षा अधिक जॉब पकडण्यासाठी करतात. 


8) टुल मेकर्स क्लॅम्प (Tool Maker's Clamp) :-

          या क्लॅम्प मध्ये दोन बाजुला जॉस असतात. आणि त्यांना दोन स्कु द्वारे जोडले जाते. याचा उपयोग ड्रिलींग करतांना दोन किंवा अधिक भागांना आपापसांत पकडण्यासाठी केला जाते. 


9) टि बोल्ट (T-Bolt) :- 

        हा इंग्रजी 'T' आकाराचा असतो. याच्या सहाय्याने मशिन व्हाईस, स्ट्रेप क्लॅम्प इ. मशिन टेबलवर चांगल्या प्रकारे फिट करता येते. ड्रिलींग मशिन (Drilling Machines) :- ड्रिलींग क्रिया करतांना ड्रिलला मशिन स्पिंडलमध्ये. पकडून फिरविले जाते व ड्रिलींग केले जाते. हे करण्यासाठी ज्या मशिनचा वापर करतात त्यास ड्रिलग मशिन म्हणतात. ड्रिल मशिनचे दोन प्रकार पडतात.

1) हॅन्ड ड्रिलींग मशिन (Hand Drilling Machine).
2) पॉवर ड्रिलींग मशिन (Power Drilling Machine).


  1) हॅन्ड ड्रिलींग मशिन (Hand Drilling Machine) : या मशिन हाताच्या सहाय्याने / मानवी बळाच्या सहाय्याने फिरविल्या जातात. याचा उपयोग जेथे विजेचा पुरवठा तसेच हवेच्या दाबाचा पुरवठा नाही. अशा ठिकाणी होतो. तसेच पत्रे कारागीर, सुतार कामासाठी या मशिनचा उपयोग होतो. याचे प्रकार पुढील प्रमाणे


 A) हॅन्ड ड्रिलींग मशिन (Hand Drilling Machine) : ही छोटया साईजची ड्रिलींग मशिन आहे. याच्या बांधणीमध्ये एक हँण्डल, दोन बिव्हेल गियर, एक स्पिंडल आणि एक चक असतो. 6 मि.मी. पर्यंत ड्रिल करणेसाठी याचा उपयोग होतो.


B) ब्रिस्ट ड्रिलींग मशिन (Breast Drilling Machine):- ही हेन्ड ड्रिल मशिन प्रमाणे असते. तिच्या वरील बाजूला एक ब्रिस्ट प्लेट लावलेली असते. हिचा उपयोग छाती (ब्रिस्ट] ची ताकद लावून केला जातो. हलक्या कामासाठी 12.00 मि.मी. पर्यंत ड्रिलींग करण्यासाठी या मशिनला उपयोग होतो.


C) रँचेट ब्रेस ड्रिलींग मशिन (Rachet Brace Drilling Machine) :- या ड्रिलींग मशिनमध्ये स्क्वेअर शॅन्क ड्रिल वापरले जाते. जेथे हॅन्ड ड्रिल मशिन व ब्रिस्ट ड्रिल मशिन जेथे वापरू शकत नाही तेथे रँचेट, ब्रेस ड्रिल मशिन वापरतात. या मशिनमध्ये एक पिलर, सपोटींग आर्म आणि रॅचेट ब्रेस असते. जेथे विजेची उपलब्धता नसते. अशा ठिकाणी मोठया जॉबवर या मशिनचा उपयोग होतो. जेव्हा रॅचेट क्लॉकवाईज फिरतो तेव्हा ड्रिल फिरतो. आणि जेव्हा रॅचेट अॅन्टी क्लॉकवाईज फिरतो तेव्हा ड्रिल फिरत नाही या प्रकारे कमी स्पिडवर ड्रिलींग केली जाते. या मशिनद्वारे 9.00 ते 12.00मि.मी. पर्यन्त ड्रिलींग केली जाते


2) पॉवर ड्रिलींग मशिन (Power Drilling Machine) : ज्या ड्रिलींग मशिन विजेच्या सहाय्याने चालतात त्यांना पॉवर ड्रिलींग मशिन म्हणतात. त्याचे प्रकार पुढीलप्रमाणे 


A) पोर्टेबल इलेक्ट्रीक ड्रिल मशिन (Portable Electric Drill Machine) :-

Types Of Drills And Drilling Uses - Learn Here        या प्रकारच्या ड्रिल मशिन वेगवेगळ्या आकारात मिळतात. ड्रिलला गती देण्यासाठी या मशिनमध्ये एक इलेक्ट्रीक मोटर वापरतात. स्पिंडलच्या शेवटच्या टोकावर ड्रिल चक बसवलेला असतो. यावर मशिन चालु बंद करण्यासाठी ऑन-ऑफ स्विच बसवलेला असतो. जेथे मोठे जॉब दुसऱ्या प्रकारच्या ड्रिलींग मशिनवर आणु शकत नाही तेथे या मशिन वापरतात या मशिन क्षमतेनुसार 6 मि.मी. ते 12 मि.मी. पर्यन्त ड्रिलींग करतात.


B) न्युमॅटिक हॅन्ड ड्रिल (Phenumatic Hand Drill) :-
       या प्रकारच्या मशिनचे हवेच्या दाबाने मोटर चालविली जाते. हवेच्या दाबाने मोटर फिरवीली जात असुन मोटर मशिनच्या पेटील ठेवायची सोय केलेली असते. एअर पाईपला हॅन्डल जोडलेले असुन ड्रिल मशिन सोयीस्कर ठिकाणी हलविता येते. या मशिनचा उपयोग ज्या ठिकाणी ईलेक्ट्रीक विज वापरण्यास मनाई असते त्या ठिकाणी होतो. उदा. स्पोटक द्रव्यांचे कारखाने, खनिज तेल शुध्दीकरण इ.


C) बेंच ड्रिलींग मशिन (Bench Drilling Machine) : 
    हि मशिन छोटया आकारची असते व नावाप्रमाणे बेंचवर ठेवली जाते. ड्रिलचा उपयोग 12.00मि. मी. व्यासपर्यंत ड्रिलींग करण्यासाठी करतात याचे ड्रायव्हन पूली. ड्रिव्हन पूली, कॉलम, हेड, फिट हॅन्डल, स्पिंडल, लिव्हर बेस, ब्रॅकेट, स्विच, मोटरइ भाग पडतात. 


D) सेन्सीटीव्ह बेंच ड्रिलींग मशिन (Sensitive Bench Drilling Machine) :- 
       हलक्या कामासाठी या मशिनचा उपयोग करतात. ही मशिन 12.50 मि.मी. व्यासा पर्यंत ड्रिल पाडू शकते. ड्रिल हे ड्रिल चक मध्ये किंवा स्पिंडलच्या टेपर होल मध्ये डायरेक्ट बसवतात. सर्वसाधारण ड्रिलीग करतांना जॉबचा पृष्ठभाग क्षितीज समांतर ठेवतात. जर एखाद्या कोनात ड्रिल होल करावयाचे असेल तर टेबल पाहिजे त्या कोनात वळवतात. स्टेप पूलीत बेल्टची स्थिती बदलून वेगवेगळे स्पिड प्राप्त करता येतात.


E) पिलर ड्रिलींग मशिन (Pillar Drilling Machine) : 

      ही मोठ्या आकाराची असून जमीनीवर ठेवली जाते वेगवेगळ्या स्पिडवर व जास्त शक्ती असलेल्या इलेक्ट्रीक मोटरने ही मशिन चालविले जाते. याचा वापर अवजड कामासाठी करतात. यामध्ये एक गोल आकाराचा मोठा पिलर असून त्याच्या वरील भागावर मशिनचे हेड फिट केले जाते हेड हे खालीवर करता येते. हे हेडच्या खाली एक टेबल असते. त्याला लिव्हर आणि रॅक व पिनीयनच्या सहाय्याने पिलरवर खालीवर करता येते. या मशिनवर 19.00 मि.मी. व्यासाचे ड्रिलींग करता येते. पिलरच्या खालील बाजुला बेस असतो. मशिन टेबलवर व बेसवर जॉब / व्हाईस क्लॅम्प करण्यासाठी T Slot दिलेला असतो. मशिन हेड वर व्ही ग्रुव्ह असलेली दोन स्टेप पूली फिट कलेली असते. पूलीच्या एका बाजूला मोटर व दुसऱ्या बाजुला स्पिंडल बसवण्याची व्यवस्था केलेली असते. दोन्ही पूलीना व्ही बोल्ट द्वारे जोडले जाते. बेल्ट पूलीवर खालीवर करून विविध स्पिडवर चालवतात.


 F) रॅडीअल ड्रिलींग मशिन (Radial Drilling Machine) :
         जास्त उत्पादन (Mass Production) करण्याच्या ठिकाणी ही मशिन वापरली जाते. यामध्ये मोठ्या आकाराचा बांधुन ड्रिलींग केली जाते. मशिनच्या स्पिंडतला अॅटोमॅटीक फिड दिली जाते. या मशिनच्या सहाय्याने 1. मोठ्या व्यासाचे ड्रिल होल करता येते. 2. जॉबच्या एका सेटींगमध्ये अनेक होल जॉबवर पाडता येतात. 3. अवजड व मोठ्या जॉबवर होल करता येते. 4. काउंटर सिव्हिंग, काऊंटर बोरींग, ट्रिपनीग, स्पॉट फेसींग, रिमग इ. सारखे ऑपरेशन करता येतात.

रॅडीयल ड्रिलींग मशिनला रॅडीअल आर्म असतो व त्यावर स्पिल हेड बसवलेली असते. स्पिडल हेडवर रॅडिअल आर्म सरकवता सरकवता येतो. आणि कोणत्याही स्थितीत लॉक करता येते. रॅडीअल आर्मला पिलर (कॉलम] चा आधार असतो. हा आर्म पिलर भोवती फिरवता येवू शकतो. त्यामुळे स्पिंडल टेबलाच्या पूर्ण वर्कींग सरफेसवर कोठेही नेता येते. आर्म पिलरवर खालीवर सरकवता येते. स्पिंडल हेडवर असलेली मोटर स्पिंडलला फिरवते व्हॅरिएबल स्पिड गिअर बॉक्स मुळे स्पिंडलला टप्प्याटप्प्याने अनेक गती (RPM) देता येतात. स्पिंडल क्लॉकवाईज व अॅन्टीक्लॉकवाईज दोन्ही दिशेने फिरविता येतो. मशिन टेबल फिरवून तिरपा करून जॉबवर कोणत्याही कोनात ड्रिलींग करता येते. या मशिनचा बेस अवजड असुन तो कास्ट आयर्नचा असतो. रेडिअल आर्मची हालचालही इलेक्ट्रीक मोटरच्या मदतीने होते व त्यासाठी रॅक व पिनीयनची सोय असते.


G) मल्टी स्पिंडल ड्रिलींग मशिन (Multi Spindle Drilling Machine):- 
       या मशिनवर एकच डिलींग हेड असते. व त्या हेडवर दोनापेक्षा जास्त स्पिंडल बसवलेले असतात. सर्व स्पिंडल गिअरने एकमेकांना जोडलेले. असतात. सर्व स्पिंडल एकाच मोटारने फिरविले जातात त्यामुळे एकाच वेळी सर्व स्पिंडल फिरतात सर्व स्पिंडल 1 हँन्डलने फिड दिली जाते. या मशिनचा उपयोग एकाच मास प्रोडक्शन (जास्त उत्पादन] च्या ठिकाणी वापरतात.. या मशिनमुळे वळचा भरपूर वचत हाते व एका जॉबवर एकच वेळेस अनेक ड्रिल होल करत येतात.


H) गँग ड्रिलींग मशिन (Gang Drilling Machine):-
       ही मशिन मल्टी स्पिंडल ड्रिलींग मशिन प्रमाणे असते याला सुध्दा दोनापेक्षा जास्त स्पिंडल असतात आणि प्रत्येक स्पिंडलला वेगळी मोटर लावलेली असते. त्यामुळे प्रत्येक स्पिंडल वेगवेगळ्या चालवला जातो. व त्याला स्वतंत्र हॅन्डल लावलेले असते. या मशिनमध्ये वर्कींग टेबल (वेस एकच असतो. त्या बेसवर 2 ते 8 स्पिंडल हेड बसवलेले असतात. मास प्रॉडक्शन मध्ये एकाच जॉबवर क्रमवार ड्रिलींग, काऊंटर सिकींग, काऊंटर बोरींग, रिमींग इ. सारखे ऑपरेशन करता येतात. त्यानुसार प्रत्येक स्पिंडलवर क्रमवार आवश्यक दुल लावलेला असतो. 
ड्राईव्ह चे प्रकार (Types of Drive)


      ड्रिल मशिनचा स्पिंडल विविध पध्दतीने चालवू / फिरवू शकतो त्याचे प्रकार पुढील प्रमाणेे

Types Of Drills And Drilling Uses - Learn Here
1) काऊंटर शाफ्ट पध्दती (Counter Shaft System):
       या पध्दतीत एक मेन शाफ्ट असतो. तो इलेक्ट्रीक मोटरने फिरवीला जातो. मेन शाफ्टला पुली आणि बेल्ट द्वारे काऊंटर शाफ्ट जोडला जातो. काऊंटर शाफ्ट पासून वेल्ट आणि पूलीचा उपयोग करुन मशिन स्पिंडल फिरवीला जातो. या प्रकारे मेनशाफ्टद्वारे विविध मशिन फिरवील्या जातात. ही पध्दत जुनी आहे. आज काल या पध्दतीचा उपयोग कमी होतो.


2) इण्डीव्युजअल मोटर पध्दत / स्वतंत्र मोटर पध्दत (Individual Motor System):- 

          या पध्दतीत प्रत्येक मशिन सोबत वेगळी मोटार असते. प्रत्येक मशिनला वेगवेगळ्या पद्धतीने नियंत्रीत केले जाते. आजकाल या पध्दतीचे हाईव्ह वापरले जातात.

मशिनवर विविध जॉबच्या अनुसार विविध स्पिंडलसाठी स्टेपपूली व बेल्टची व्यवस्था केलेली असते. आधुनिक मशिनवर स्पिड चेंजसाठी लिव्हर लावलेले असतात व स्पिड चार्ट दिलेले असतात. चार्टनुसार विविध स्पिडवर लिव्हर सेट करून चालवले जातात.


फिडला कन्ट्रोल करण्याच्या पध्दती (Methods of Controlling Feed) :- 

 ड्रिल प्रत्येक फेयात धातू [जॉब] मध्ये प्रवेश करतो. त्याला ड्रिलची फिड म्हणतात. ड्रिलींग करते वेळी खालील फिड दिले जातात.


1) क्विक हॅन्ड फिड (Quick Hand Feed):-
      जेव्हा लवकर आणि जास्त मटेरिअल कापावयाचे असते त्यावेळी है फिड वापरतात. हे क्विक फिड लिव्हर हाताने चालवले जाते.


2) सेन्सेटिव्ह हॅन्ड फिड (Sensitive Hand Feed):-
        या फिडचा उपयोग ट्रायल कट आणि छोटे ड्रिलींग करण्यासाठी होतो. याला सेन्सेटीव्ह हॅन्ड फिड लिव्हर किंवा व्ही फिड व्हीलला हाताने चालवले जाते.


3) अॅटोमेंटिक फिड (Automatic Feed) :- 
     जेव्हा मोठया साईजचे ड्रिल होल करावयाचे असते आणि कटींग प्रेशर गरजेनुसार जास्त ठेवायचे असते. त्योवळेस या फिड उपयोग करतात. जॉबवर जितक्या फिडचा उपयोग करावयाचा आहे. तीतका फिड मशिनवर सेट करावयाचा आणि मशिन सुरु करणे यामुळे हाताशिवाय (without Hand Process) ड्रिलींग होते. 
ड्रिलींग (Drilling): ड्रिलींग मशिनवर खालील प्रकारचे ड्रिलींग केले जाते. 


1) थ्रु होल ड्रिलींग (Through hole drilling):- या ऑपरेशन मध्ये जॉबच्या आरपार [थु] ड्रिलींग केले जाते, ड्रिल आणि ड्रिल मशिनच्या सहाय्याने केले जाते.


2) ब्लाइन्ड होल ड्रिलींग (Blind Hole Drilling) :- या आपरेशन मध्ये ड्रिल आणि ड्रिल मशिनच्या सहाय्याने जॉबच्या ठराविक खोलीपर्यंत ड्रिल होल केले जाते. ड्रिल होल हे जॉबच्या आरपार केले जात नाही.


3) पायलट होल ड्रिलींग (Piolet hole drilling):- या ऑपरेशनमध्ये ड्रिल आणि ड्रिल मशिनच्या सहाय्याने मोठया व्यासाचे ड्रिलींग करण्याअगोदर छोटया व्यासाचे ड्रिल होल केले जाते. या ऑपरेशनला पायलट ड्रिलीग म्हणतात.----- ड्रिलींग पध्दत ( Method of Drilling) -----


ड्रिलींग करताना खालील अनुक्रम लक्षात ठेवावा. 
1) सर्वप्रथम ड्राईंगच्यानुसार जॉबवर ड्रिल होलची मार्कंग करावी.
2) कामानुसार व मटेरिअल नुसार ड्रिलची निवड करावी व त्याचा कोन ग्राईंडिंग करावी.
3) ड्रिलींग मशिनची कंडिशन ठिक करणे / चालु स्थितीत तपासणे.
4) जॉबवर / ड्रिल होलच्या पॉईन्टवर सेन्टर पंचने पंचींग करावी. 
5) मार्कंग व पंचींग केलेला जॉब मशिन व्हाईसवर फिट करुन मशिन व्हाईस मशिन टेबलवर ठेवावी व व्हाईस टी-बोल्ट व क्लॅम्पच्या सहाय्याने टेबलवर फिट करावी.
6) गरजेनुसार जरुरीनुसार मशिन व्हाईस मध्ये जॉबच्या खालील बाजुस लाकडी पॅकींग लावावी / ठेवा.
7) ड्रिल मशिनच्या टेबलाला जॉबच्या उंची नुसार सेट करावे/अॅटजेस्ट करावे. 
8) ड्रिलला मशिन स्पिडलमध्ये व्यवस्थित फिट करावे व ड्रिलच्या सेंटरला जॉबचा सेंटर पंच मॅच करावा.
9) ड्रिल मशिन स्पिंडलला हाताने फिरवून ड्रिल व्यवस्थित लागला की नाही ते चेक करावे.
10) ड्रिल मशिनची डायरेक्शन क्लॉक वाईज चेक करावी.
11) ड्रिल मशिनच्या गरजेनुसार स्पिड .
12) ड्रिल मशनि सुरु करुन ड्रिलीग ऑपरेशन.
13) ड्रिल जॉबमध्ये थोडा गेल्यावर मशिन करुन तो व्यवस्थित सेंटर जातो की नाही ते तपासावे.
14) ड्रिलींग करतांना जॉबच्या खोली पर्यन्त आल्यावर ड्रिलचा स्पिड कमी करावा.
15) ड्रिलच्या पॉईंटवर कुलट सतत पडत आहे है। बघावे, व कुलंट जॉबच्या मटेरिअलनुसार सिलेक्ट करावे.
16) ड्रिलींग करताना ड्रिल मधून मधून जॉबच्या बाहेर / वर काढावे.
17) कापलेल्या चिप्स या ब्रशने साफ करावे. 
18) ड्रिलींग झाल्यावर मशिन व व्हाईस स्वच्छ करुन ऑईल लावून ठेवावे.


ड्रिलींग करतांना वापरावयाचे कुलंट (Cullents used for drilling)

types of drills and drilling uses - learn Here
 क्र. मटेरिअल                                            कुलंट
 
1. हाय कार्बन स्टिल                      लॉर्ड ऑईल, सोल्युबल ऑईल 
2 माईल्ड स्टिल व रॉट आयर्न           लॉर्ड ऑईल, सोल्युबल ऑईल
3. कास्ट आयर्न                                  कोरडे (कुलट नाही)
4. ब्रास व ब्रॉन्ज कोरडे                           ( कुलट नाही)
5. अॅल्युमिनिअम व तांबे                    रॉकेल / केरोसीन 
स्पिड कटींग स्पिड आणि फिड (Speed cutting speed and feed)ड्रिलचा स्पिड (Speed of Drill) :- 

       ड्रिल एका मिनीटात स्वतःभोवती जितके फेरे पूर्ण करतो त्याला ड्रिलचा स्पिड म्हणतात. हा फेरे प्रति मिनीट (Revolation per minute) म्हणजेच RPM ने दर्शवितात. RPM हा ड्रिलच्या व्यासानुसार वेगवेगळा असू शकतो. मोठ्या व्यासाच्या ड्रिलसाठी RPM कमी ठेवतात व लहान व्यासाच्या ड्रिलसाठी RPM जादा ठेवतात. 


कटींग स्पीड (Cutting speed) :-

दूलची कटींग एज धातू कट करतांना एका मिनीटात जेवढे अंतर चालून जाते त्यास कटींग स्पीड म्हणतात. कटींग दुलने किंवा ड्रीलने एका मिनीटात चाललेले अंतर म्हणजे कटींग स्पीड होय. किंवा ड्रिलने त्याच्या परिघावर एका मिनीटात कट केलेल्या मटेरिअली लांबी कटींग स्पीड होय. कटींग स्पीडला पेरिफेरल (Penpheral Speed) किंवा सरफेस स्पिड (Surface speed) असेही म्हणतात. मॅट्रीक पध्दतीत कटींग स्पीड meter/ minute मध्ये दर्शवितात व (Cutling Speed] व ब्रिटीश पध्दतीला कटींग (Foot/minute) मध्ये दर्शवितात. 

सूत्र (Formula)


1] ड्रिलचा व्यास इंचा मध्ये असेल तर

   Cutting speed (c.s.) = TT xdx RPM ft/min
                                               / 12
R.P.M. = C.S. X12 / TT X d
c.s. = cutting speed meter/min = 3.1416 किंवा 22/7
d = drill चा व्यास इंचामध्ये
R.P.M. = ड्रिलचे एका मिनीटात फेरे
----- कटींग फिड (Cutting Feed) -----


ड्रिल जॉबमध्ये एक पूर्ण फेऱ्यात चाललेले अंतर म्हणजे फिड होय.
Feed= Depth of hole / Time x R.P.M.
Time = Depth of hole / Feed x R.P.M..

types of drills and drilling uses - learn Hereटिप :- ड्रिलच्या पॉईन्टवर कटींग अँगल बनलेला असतो. या पॉईन्टच्या उंचीला कोन हाईट म्हणतात जर प्रश्नात कोन हाईट दिलेली असत तर फिड किंवा Time खालील सूत्राने काढावा कारण टिवस्ट ड्रिलमध्ये ड्रिलच्या कटींग पॉईन्टची लांबी ड्रिल व्यासाच्या 1/3 पट [0.33 पट] असते म्हणून सुत्रात होलची खोली होलच्या दिलेल्या खोली [0.3 D] मिळवतात त्यामुळे वरील सुत्र खालील प्रमाणे घेतात.
  
F= L + b / TXN. T = L+B / FXN
F Feed प्रत्येक फेन्याला
एल = ड्रिल होल ची उघडली
b- ड्रिल ची कोन हाईट
T= टाईम मिनिटामध्ये
N= ड्रिल चा R.P.M.
d= टाईम ड्रिल चा व्यास


Materials   
Cutting Speed Foot Per Min     
Cuttiing speed Meter per Min

Stainless Steel
50
15

Tool Steel
60
18

Mild Steel
80
24

Soft Steel
100
35

Soft Cast Iron
100
35

Brass
200
64

Aluminum
300
95


          टीप- उच्च कार्बन स्टील ड्रिलसाठी उच्च कटिंग स्पीड स्टील ड्रिल च्या बरोबर ठेवली जाते.Conclusion :- 

          अश्याच मेकॅनिकल इंजिनीअरिंग च्या माहितीसाठी मला instagram वर फॉलो करा. अन् अजून काही माहिती हवी असल्यास कमेंट्स करून कळवा. मी सदैव माहिती टाकण्यास तत्पर राहील, धन्यवाद.


      
               Copyright All Rights Reserved By
                                 ©   Bhushan Savande

Post a Comment

0 Comments