IRCTC वर अकाऊंट कसे बनवावे l How To Create irctc Account

             Technology मुळे आपली खूप काही छोठी-मोठी  कामे साधी अन सरळ झाली आहे.त्यातीलच एक काम म्हणजे रेल्वेची तिकिटे ऑनलाइन बुक करणे. जिथे आधी आपण मोठ-मोठ्या रांगेमध्ये उभे राहून तिकीट बुक करत होते आता आपण एका क्लिक वर घरी बसून  तिकिटे Book करू शकतो.

IRCTC वर अकाऊंट कसे बनवावे l How To Create irctc Account              अन अश्याच प्रकारे खूप लोक पण तिकिटे Book करता. पण तुम्हाला माहीती आहे का हेच तिकिटे Online Book करण्यासाठी काय करावे लागते, अन जे लोक Online Ticket Book करता त्यांना खूप अडथळे येतात. तर तश्या प्रकारचे अडथळे तुम्हाला येवू नये म्हणून IRCTC वर अकाऊंट कसे बनवावे.Irctc वर अकाऊंट बनवून Railway Ticket कसे Book करावे. याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण  माहीती आपल्या वेबसाईट वर देत आहे.

टीप :   वाचाकानो तुम्ही ज्या Railway चे  Ticket Online Book करता तेव्हा सर्वात महत्वाच असत कि त्या रेल्वेचे  किती सिट खाली आहेत. जे सिट खाली असतील तेच आपण Book करू शकतो. अश्यात ज्या लोकांना ह्या गोष्टीची माहीती नसते ते लोक  Waiting वर सिट दिसत असतील तरी ते सिट बुक करण्याचा प्रयत्न करतात. व अश्यात त्यांना Waiting वर ठेवून Waiting वाले तिकिटे दिली जातात. अन एकदा का Railway आपल्या बसण्याच्या स्टेशनवर येवून पण जर का ते Waiting वाले तिकिटे कॉन्फिर्म नाही झाली तर ते Ticket Cancel Ticket म्हटले जाते. अन Ticket Book करताना जे पैसे तुम्ही Pay / Payment केले असता ते 7 Working Day's मध्ये परत तुमच्या बँक अकाऊंट मध्ये जमा होतात.


     
IRCTC फुल फॉर्म - Indian Railway Catering And Tourism Corporation

IRCTC हि रेल्वे द्वारा चालवली जाणारी संस्था आहे. जिच्या  माध्यमातून आपण Online Railway Ticket Book करू शकता. जवळ- जवळ  1 0 लाखाच्या आसपास रोज याच्या माध्यमातून तिकिटे बुक होत असता. हा पण आता Covid-19 चा असर असल्यामुळे Railway वर पण खूप Effect जाणवला आहे.

IRCTC  वर अकाऊंट कसे बनवावे


IRCTC वर खाते तयार करण्यासाठी महत्वाच्या गोष्टी


 • प्रथम आपले वय  किमान 18 वर्षांचे असणे आवश्यक आहे
 • आपल्याकडे मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
आधार कार्ड (जर तुम्ही 12 तिकीट च्या वर  तिकिट बुक केले तर)
IRCTC  खाते तयार करताना, आपल्याकडून विचारला  जाणारा तपशील अत्यंत काळजीपूर्वक भरावा, जर आपण सर्व तपशील योग्यरित्या भरले तर IRCTC  Account तयार करताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

 • सर्वप्रथम तुम्हाला IRCTC ची वेबसाइट उघडावी लागेल किंवा खाली दिलेल्या लिंक वर  क्लिक करून तुम्ही IRCTC च्या वेबसाइट वर जाऊ  शकता. (https://www.irctc.co.in)
 • IRCTC ची वेबसाईट ला उघडल्यावर तुम्हाला समोर एक नवीन page दिसेल त्यामध्ये Log In अन Sign Up च Option दिसेल तीथे क्लिक करा.
 •  क्लिक केल्यानंतर समोर एक नवीन Page ओपन होईल त्या Page मध्ये मी खाली जी-जी माहीती देत आहे. ती काळजीपूर्वक भरा अन जो तुमचा User Id अन Password तयार होईल तो तुम्ही लक्ष्यात ठेवाल.
    
          
IRCTC वर अकाऊंट कसे बनवावे l How To Create irctc Accountया page मध्ये तुम्हाला खाली दिलेली सर्व माहीती भरावी लागेल.
 • Username :


           Username तयार करताना तुम्हाला एकमेव असे Username तयार करावे लागेल जे आधी कोणी IRCTC वर वापरले नसेल, जर का आधी कोणी वापरले Username तुम्ही टाकाल, तर तुम्हाला Error दाखवेल तुमचे IRCTC वर अकाऊंट ओपन होणार नाही, त्यासाठी एकमेव असे Username तयार करावे, तिथे तुम्हाला Suggestion पण येईल कि कोणते Username आधी पासूनचे आहे अन कोणते नाही.  (Username 4-9  अक्षर मध्ये असावे त्या नावामध्ये कुठलेही दुसरे तुम्ही स्पेशल कॅरक्टर वापरू शकता .)

 • Password :


            Username टाकल्यानंतर तुम्हाला एक Password बनवावा लागेल ज्याची लांबी कमीत कमी 8 अक्षर अन जास्तीत जास्त लांबी 15 अक्षर पर्यंत ठेवू शकता. ज्यामध्ये एक कॅपिटल अक्षर अन एक नंबर पण असायला हवा. अन हो एक गोष्ट सर्वाना माहितीच असते ती म्हणजे आपला password गोपनीय ठेवावा. तो दुसर्यांना कधीही share करू नये.


 • Security Question :


          इथे तुम्हाला तुमचा Security Question टाकावा लागेल जो तुम्हाला खूप कामात येईल, पुढे जेव्हा तुम्ही User Id किंवा Password विसराल. जसे कि What Is Your First Pet , What Is Your First Bike Or Car , Who is Your Best Friend, First School Name , ETC अश्या प्रकारे तुम्हाला तिथे Security Question विचारले जातील त्यातील एक निवडून त्या Question चे उत्तर द्यावे अन ते उत्तर/ Answar लक्ष्यात ठेवावे. जसे कि मी वर  सांगितले तसे तुम्हाला ते कामात येत जाईल. अन हो ही Security Question पण गोपनीय ठेवावे.


 • Security Answar :


             वर जो तुम्ही Security Question टाकला आहे त्याचे तुम्हाला इथे Answar टाकायचे आहे. अन हो हे Security Answar पण गोपनीय ठेवावे कोणालाही माहीती पडता कामा नये. नाहीतर तुम्हाला माहितीच आहे दुनिया किती पुढे आहे. ह्या Digital जगात मोठ-मोठ्या कंपन्या आपला Personal Data Sell अन Buy करत असतात, म्हणून मी माझ्या वेबसाईट वरील वाचकांना वेळोवेळी सावध करत असतो कि आपण ह्या Technology च्या जगात कसे इंटरनेट वर कसे Safely फिरावे.

 • Preferred Langauge :


           Preferred Langauge मध्ये भाषेचे तुम्हाला दोन Option मिळतील 1. English , 2. Hindi. तसे बघितले तर IRCTC ने इथे आपल्या मराठी भाषेचे पण Option द्यायला हवे कारण सर्वात जास्त प्रवासी तर आपल्या महाराष्ट्रामधील आहेत.  अन सर्वात जास्त लोक तर महराष्ट्र मध्येच येतात, त्यामुळे आपल्या मराठी भाषेला जास्त महत्व दिल पाहिजे असो सरकार ला जर  करायचं असेल तर सरकार कारेल हो पण त्यासाठी आपले मराठी लोक पण जागृत असायला हवे.

तुम्हाला जी भाषा  येत असेल समजत असेल ती Select करून घ्यावी जेणेकरून तुम्हाला  SMS पण तुम्हाला  त्याच भाषेत येत जाईल.

 •  Fisrt Name  :


           इथे तुम्हाला तुमचे नाव टाकायचे आहे जसे माझे नाव Bhushan Savande आहे , तर मला Bhushan टाकावे लागेल.


 • Middle Name :


        Middle Name मध्ये तुम्हाला तुमच्या पूर्ण नावातील मधील नाव टाकायचे आहे . म्हणजे तुमच्या पूर्ण नावामध्ये जर का तुमच्या वडिलांचे किंवा आईचे नाव असेल तर ते टाकावे.

 • Last Name :


         Last Name मध्ये तुम्हाला तुमचे आडनाव टाकावे लागेल आपण त्याला Surname पण म्हणतो. जसे माझे नाव भुषण सावंदे आहे तर त्यामध्ये मी माझे last name म्हणजेच Savande असे टाकेल.

 • Gender :


        Gender मध्ये तुम्हाला तुमचे लिंग टाकावे लागेल जर तुम्ही पुरुष असाल तर Male , स्त्री असाल तर Female  अश्या प्रकारे तुम्हाला तुमचे gender भरावे लागेल.

 • Married Status :


        जर तुमचे लग्न झाले असेल तर तर Married वर क्लिक करावे अन जर का लग्न झाले नसेल तर Unmarried वर क्लिक करावे.

 • Date Of Birth :


       इथे तुम्ही तुमची पूर्ण जन्म तारीख टाकावी. आधी तिथे बघावे कि कोणत्या Type मध्ये जन्म तारीख विचारत आहे. त्या प्रकारात Type करावी. जास्तीत-जास्त तर " ००/००/०००० " ह्या Font मध्येच ते जन्मतारीख टाकण्यासाठी सांगतात. जर का तुमचा जन्म तारीख टाकण्याचा प्रकार चुकला, तर  तुम्हाला Error येईल.

 • Occupation :


         Occupation मध्ये तुम्हाला टाकेल लागेल कि तुम्ही  काय व्यवसाय करता, जर का तुम्ही Student असाल तर Student च पण तिथे तुम्हाला Option मिळेल अन जर का तुमचा काही व्यवसाय असेल तर ते तुम्हाला टाकावे लागेल. तुमचा व्यवसाय जर का त्यांनी दिलेल्या लिस्ट मध्ये येत नसेल तर तिथे तुम्हाला " Other " हे Option पण दिसेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता.

 • Aadhar Card No :


        तसे बघितले तर आधार कार्ड नंबर टाकणे  इतके महत्वाचे नाही पण जर का तुम्ही 1 महिन्यामधून 6 ticket च्या वर जर का तिकिटे बुक कराचे असेल तर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकणे गरजेचे आहे,  अन जर का तुम्ही आधार कार्ड नंबर नाही टाकला तर तुम्ही फक्त एक महिन्यामध्ये 6 ticket Book करू शकता त्याच्यावर ticket Book करायला जाल तर तुमचा Payment कट होऊन तुमचे Ticket बुक नाही होणार पण  IRCTC च्या कामाचे 7 दिवसाच्या आत परत तुम्हाला तुमचा Payment परत मिळेल.

 • Pan Card :


         जर का तुमच्या कडे Pan कार्ड असेल/नसेल तर तुम्ही टाकू शकता तस बघितलं तर तुम्ही ती जागा खाली सोडू शकता हे ऑप्शनल  आहे.

 • Country  :


         जर तुम्ही आपल्या भारत देशातून असाल तर तुम्ही "India" हा पर्याय सिलेक्ट करावा अन जर का परदेशातून असाल तर "Other Country" हा पर्याय सिलेक्ट करावा.

 • Email Id :


         Email Id  मध्ये तुम्हाला तुमची Email Id टाकायची आहे. जेव्हा पण तुम्ही Ticket Book कराल तेव्हा ते Ticket Email Id वर येत असत, अन हेच नाही तर जर का तुम्ही तुमचा User ID किंवा Password  विसराल तेव्हा तुम्हाला तुमच्या ह्याच Email Id वर Otp येत जाईल अन हो सर्वात महत्वाची हि पण गोष्ट आहे. कि कधीही आपला OTP कोणाला  सांगू नये किंवा share करू नये. ह्याच email Id वर तुम्हाला PNR Number, Seat Number , etc गोष्टी मिळत जातील, जेव्हा तुम्ही ticket Book कराल

 • ISD Mobile :


         इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. जेव्हा तुम्ही भविष्यात तिकिटे Book कराल तेव्हा तुम्हाला SMS द्वारे गाडीची स्थिती, Seat Number,  रेल्वे येण्याची वेळ अन जेव्हा Reservation चा चार्ट प्रिंट होतो तेव्हा तुम्हाला अश्या प्रकारची सर्व माहीती तुमच्या मोबाईल नंबर वर येत जाईल.


 • Nationality :


        इथे तुम्ही तुमचे राष्ट्रीयत्व टाकावे जर तुम्ही भारतीय असाल तर Indian , अन जर का Other Country चे असाल तर ते टाकावे.

 • Adress :


       इथे तुम्हाला तुमचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे, शक्यतो जो पत्ता आधार कार्ड वर असेल तोच टाकावा.
     
         तुम्हाला जर का अस वाटत असेल कि इथे Adress च काय काम तर IRCTC दोन प्रकारचे पर्याय देते एक Online Ticket हे तिकीट तुम्हाला तुमच्या मोबाईल वर PDF किंवा JPGE च्या स्वरुपात मिळत  अन दुसर म्हणजे I-Ticket हे तुम्हाला कागदाच्या स्वरुपात  तुमच्या Adress Railway कडून मिळते, अश्या प्रकारचे Ticket प्रवासाच्या काही दिवस आधी Book कराव लागत, त्यासाठी इथे Adress खूप महत्वाचा असतो.


   हे सर्व झाल्यानंतर, खाली तुम्हाला  कॅप्चा कोड प्रविष्ट केल्यानंतर  सबमिट वर क्लिक करावे लागेल.

IRCTC वर अकाऊंट कसे बनवावे l How To Create irctc Accountसबमिटवर क्लिक केल्यावर, तुम्हाला  या चित्रात दर्शविल्याप्रमाणे अटी आणि शर्तीस मान्यता करण्यास सांगितले जाईल, तुम्हाला IRCTC  वर अकाऊंट उघडण्यासाठी त्यांच्या अटी अन शर्ती मान्य कराव्या लागतील, सहमत असलेल्या अटी आणि शर्तीवर क्लिक करावे लागेल, त्यानंतर You HaveBeen Successfully Registered. असा  संदेश तुमच्या विंडोवर येईल. व पुढे असेल कि Please Click Here To Login  And Active Your  Account , तर इथे क्लिक करून तुमचे अकाऊंट Active करण्यासाठी क्लिक करावे.अकाऊंट Active करण्यासाठी तुम्ही जो Email Id अन मोबाईल नंबर टाकला आहे त्यावर आलेला OTP टाकावा व Submit या बटनावर क्लिक करावे. असे केल्यास तुमचे अकाऊंट Active होऊन जाईल व आता तुम्ही इथून पुढे Online Ticket Book करण्यास सक्षम आहात.


मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीच्या ओटीपी पडताळणीनंतर आपण आपल्या आयआरसीटीसी खात्यात लॉग इन करून तिकिट बुक करू शकता. मला आशा आहे की तुम्हाला हे समजले असेलच की IRCTC वर  अकाउंट कसे बनवावे  आणि पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही ट्रेनने प्रवास कराल तेव्हा तुम्ही तुमचे तिकीट स्वतःच ऑनलाईन बुक कराल.


जर का तुम्हाला अजूनही काही शंका असतील तुम्ही मला तुमच्या शंका Comments  करून विचारू शकता नाहीतर मग आपले तर Telegram Channel आहेचTelegram Channel - t.me/lifestyleknowPost a Comment

0 Comments