SBI मध्ये आधार कार्ड लिंक कसे करावे.- How To Link Aadhar In State Bank Of India

    घरी बसून करा स्टेट बँकमध्ये आधार कार्ड लिंक                State Bank Of India मध्ये तुमचे बँक अकाऊंट ला आधार कार्ड लिंक करण्यासाठी ३ पर्याय उपलब्ध आहेत. अन असे नाही की तुम्ही ह्या प्रोसेस ने फक्त SBI मध्येच आधार कार्ड लिंक करू शकतो. जवळ-जवळ सर्वच बँकांनची सिस्टम्स ही सारखीच असते हा फक्त थोडा फार फरक असतो. पण आपण व्यवस्थित समजून घेतले तर तुम्ही इतर बँकांना पण तुमचे आधार कार्ड लिंक करू शकतो ही प्रोसेस वाचून. 
       
       


             SBI बँक अकाऊंटला आधार कार्ड लिंक करण्यासाठी २ पर्यायांनी तुम्ही फक्त ५ मिनिटामध्ये तुमचे अकाऊंट ला आधार कार्ड लिंक करू शकता अन ३ रा पर्याय जर का तुम्हाला वापरायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला SBI च्या ATM मध्ये जाव लागेल.

नेट बँकिंग ने आधार कार्ड लिंक करणे

       जर तुमचे इंटरनेट बँकिंग नसेल तर ती कशी चालु करावी याची माहितीसाठी येथे क्लिक करा .
 1. सर्वात आधी तुम्ही SBI च्या पोर्टल वर जा तिथे तुमचे SBI चे नेट बँकिंग अकाऊंट Log In करा. 

 

      2. Log In  झाल्यांनतर तुम्हाला समोर Account नावाच्या खाली E-Services पर्याय दिसेल. त्या पर्यायवर क्लिक केल्यावर तुम्हाला Update Aadhar Card हा पर्याय दिसेल तिथे क्लिक करा.
 

3. आता तुम्हाला इथे तुमचे SBI Account सिलेक्ट करण्याचा पर्याय दिसेल तुमचे Account Select करा.
 

4. इथे तुम्हाला आता तुमचा आधार नंबर टाकण्याचा पर्याय दिसेल तुमचा आधार नंबर टाकून Submit ह्या पर्यायवर क्लिक करा.
 

5. पुढच्या ह्या प्रक्रिया मध्ये तुमच्या आधार कार्ड ला जो तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर तुम्हाला एक OTP येईल.
 

6. इथे तो आलेला OTP टाकून इंटर करून, Submit करून द्या.
 

7. तुम्हाला तुमचा आधार नंबर बँक Account शी लिंक झाल्याचा SMS येईल. (जर बँकमध्ये तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला SMS येणार नाही.)


YONO SBI Aap ने आधार कार्ड लिंक करणे


          जर तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही YONO Aap डाऊनलोड केले नसेल तर ते तुम्ही आधी डाऊनलोड करून घ्या. Yono Aap ने तुम्ही बहुतेक खूप काही काम तुम्ही घरूनच करू शकता, त्यासाठी तुम्हाला बँक मध्ये जाण्याची गरज नाही.


 
1. Yono Aap मध्ये तुमचे बँक अकाऊंट Log In करून घ्या.
 

2. पुढे तुम्हाला खाली स्क्रोल केल्यास Service Request असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
   
    3. त्यांनतर तुम्हाला Profile असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
 
     4. यांनतर तुम्हाला इथे आधार कार्ड लिंक करण्याचा पर्याय Link Aadhar दिसेल त्यावर क्लिक करा.
 

5. इथे तुम्हाला CIF नंबर सिलेक्ट करावा लागेल तो सिलेक्ट करा. व तुमचा आधार नंबर टाका, T&C ला टीक मारून Submit करा.


 6. तुमच्या आधार कार्ड ला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर तुम्हाला SMS ने OTP येईल. तो टाकून प्रोसेस पूर्ण करा.
 

7. तुमचे आधार कार्ड लिंक झाल्याचा तुम्हाला SMS येऊन जाईल.
ATM च्या माध्यमातून


 1. तुमच्या जवळील असलेल्या बँक ATM मध्ये जा.


 2. त्या ATM मशीन मध्ये तुमचे कार्ड स्वाईप करा.


 3. तुमच्या ATM चा Password प्रविष्ट करा.


 4. पुढे तुम्हाला खूप पर्याय दिसतील जसे की – Withdrawal , Fast Withdrawal, Service, Pin Change, इत्यादी त्यापैकी तुम्हाला Service ह्या पर्यायवर क्लिक करायचे आहे.


 5. पुढील Window मध्ये तुम्हाला Registrations असा पर्याय दिसेल तिथे क्लिक करा.


 6. आता तुम्हाला Aadhar Registration चा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.


 7. Type Of Accountइथे तुमच्या खाते चा प्रकार सिलेक्ट करा.
 

8. Aadhar Card नंबर २ वेळेस टाकायला सांगितला जाईल तो टाका.


 9. इथे तुम्हाला आधार कार्ड ला लिंक असलेल्या मोबाईल नंबर वर तुम्हाला एक OTP येईल तो प्रविष्ट करा. 


 10. तुम्हाला आधार कार्ड तुमच्या बँक अकाऊंटशी लिंक झाल्याचा SMS येईल.       वाचकानो ह्या मध्ये अजुन एक ४था पर्याय पण आहे. तो म्हणजे बँक मध्ये जाऊन आधार नंबर लिंक करणे. त्यासाठी बँक मधील कर्मचारी तुम्हाला एक फॉर्म देतील तो भरून तुम्हाला बँक माध्ये जमा करावा लागेल.  

        
           तर मित्रानो कशी वाटली तुम्हाला माहीती खूप लोक असे असतात त्यांना माहीती नसते कि बँक मध्ये आधार कार्ड कसे लिंक करावे त्या लोकांसाठी ही माहीती परिपूर्ण ठरेल अन ही प्रोसेस वाचून ते घरूनच आधार कार्ड लिंक करू शकतील यात शंका नाही चला तर मित्रानो अश्या लोकांना ही माहीती शेअर करण्यास विसरू नका.

मला Instagram वर Follow करण्यासाठी खाली माझ्यानावावर Click करा.


                                                    ©® भुषण सावंदेPost a Comment

2 Comments