Income Certificate काढा आता घरबसल्या फक्त 33.60/- रु मध्ये

      ३३.६०/- रु मध्ये काढा Income Certificate


   

      Income certificate काढण्याचा सर्वात सोपा उपाय


               कागदपत्रे हे प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्वाची भूमिका निभावतात त्यातील म्हणजे एक Income Certificate हे Certificate खास करून विद्याथार्ना शिष्यवृत्ती साठी लागते व हे खूप लोकांना माहीती असून पण ते काढून ठेवत नाही व ऐनवेळी लागल्यास त्यावेळी त्यांना समजत नाही कि हे कुठून व कसे, काढावे अश्यात मग ते कोण्या दलाल ला भेटून जास्त पैसे काढतात तर कोणी Fraud ला बळी पडतात 

     
Income Certificate काढा आता घरबसल्या फक्त 33.60/- रु मध्ये


            अश्या घटना तुमच्या सोबत घडू नये म्हणून मी तुम्हाला ह्या पोस्ट मध्ये संपूर्ण माहिती व सोबत Screenshot देऊन सागणार आहे कि फक्त ३३.६० रु /- मध्ये Income Certificate कसे काढावे.

Income Certificate लागणारे कागदपत्रे : 


 1. वयाचा पुरावा – Birth Certificate/School Leaving Certificate/Pan Card.

 2. पत्त्याचा पुरावा – Ration Card/Voter Id/Passport/Driving License/Electricity Bill/Water Bill / Property Tax Receipt.

 3. फोटो – Passport साईज फोटो.

 4. Identity Proof - Aadhar Card/Voter Id / Driving License.

 5. तालाठीचा उत्पन्न दाखला.

 6. etc.

उत्पन्न दाखल्यासाठी Online अप्लाय कसे करावे :


           चला तर मित्रानो आता आपण जाणून घेऊ की Income Certificate Online कसे काढावे. पुढील सर्व स्टेप हे लक्ष्य देऊन वाचा व मी प्रत्येक स्टेप खाली तुमच्या मदतीसाठी Screenshot देखील दिले आहेत ते पण तुम्ही व्यवस्थित बघा. व काही माहीती अजून हवी असल्यास मला मेल करा.


            स्टेप १ . सर्व प्रथम तुम्ही आपले सरकार ह्या Website ला Open करून घ्या. ही Website ओपन करण्यसाठी तुम्ही पुढील लिंक वर क्लिक करून ओपन करू शकता

https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en/Login/Login


           स्टेप २. खाली दिलेल्या Screenshot प्रमाणे तुमची Window ओपन होईल तुम्हाला ज्या व्यक्तीचे Income Certificate काढायचे आहे त्या व्यक्तीचे Account ह्या Website मध्ये ओपन करावे लागेल त्यासाठी तुम्ही “ New User / Register Here.. “ येथे क्लिक करून संबंधित व्यक्तीचे account ओपन करून घ्या.


      


           स्टेप ३. आता संबधित व्यक्तीचे Account तयार झाले व तुम्ही ते Account लॉग इन करून घ्या.

       


           स्टेप ४. Account ओपन झाल्यावर तुम्हाला आपले सरकार ह्या Website मधून “ Revenue Department “ इथे क्लिक करून त्यामध्ये तुम्ही Income Certificate बनवण्यासाठी “ ‘INCOME CERTIFICATE’ इथे क्लिक करा.

                   स्टेप ५. आता तुमच्या समोर एक Form Open झाला असेल त्यामधील पहिले Option वर क्लिक करून निवडू शकता, कि तुम्हाला किती वर्षासाठी उत्पन्न दाखला हवा आहे इथे तुम्ही १ वर्ष निवडून घ्या. (तुम्हाला किती वर्ष निवडायच आहे ते तुमच्यावर आहे तुम्हाला किती Year साठी लागत आहे.)           स्टेप ६. व आता पुढे Form मध्ये जी पण माहीती दिली आहे, ती तुम्ही तुमची माहीती व्यवस्थितपणे Fill-up करा Application Details मध्ये ज्याला Income certificate ची जरुरत आहे. त्याच नाव टाका पण जर का Income Certificate तुमच्या मुलाबाळांना लागत आहे तर ते त्यांच्या वडिलांच्या नावावर बनवावे.

       

  शेअर मार्केट बद्दल संपुर्ण माहिती आपल्या मातृभाषेत मराठी मध्ये

  इंटरनेट किंवा वायफाय ची स्पीड कशी वाढवावी
       (मी आश्या व्यक्त करतो कि तुम्ही Form मधील संपूर्ण माहीती व्यवस्थितपणे भरली असेल.)

           स्टेप ७. व आता तुम्ही हि माहीती Submit करून ‘Uplod Document’ ह्या स्टेप मध्ये आले. ह्या स्टेप मध्ये तुम्हाला मी वर सांगितलेले सर्व कागदपत्रे मधील एक एक अपलोड करायचे आहे. (जसे की – वयाच्या पुराव्या मधील एक कागदपत्र, पत्त्याच्या पुराव्या मधील एक असे करून तुमचे कागदपत्रे अपलोड करायचे आहे.)         Self Decleration हा Form Download करण्यासाठी तुम्ही खालील screenshot वर मी मार्क केल आहे तुम्ही Website मधील अश्याच Icon वर क्लिक करून तो Form Download करून भरून अपलोड करावा.  
 
   

 

          स्टेप ८. पुढील स्टेप ही पैसे Pay करण्याची आहे जस की मी तुम्हाला सांगितलं होत कि ३३.६० रु/- मध्ये उत्पन्न दाखला तुम्ही बनवू शकता आता हीच स्टेप आहे तुम्ही मी दिलेल्या Screenshot बघू शकता त्यामध्ये तुम्हाला माझे पण चलन दिसेल. तर तुम्ही ही इथे चलन देण्यासाठी तुम्हाला Online खूप पर्याय आहे. तेथील एक कोणता पण पर्याय निवडून हि स्टेप पूर्ण करून घ्या.

    


           स्टेप ९. हि स्टेप पूर्ण झाल्यावर तुम्हाला Screenshot मध्ये दाखवल्याप्रमाने तुमची प्रोसेस दिसेल.

       

 

           स्टेप १०. आता तुम्ही ‘Your Transion History’ मध्ये तुमच्या आप्लीकेशन चे स्टेटस बघू शकता. तिथे तुम्हाला ‘In Progress’ अस दिसेल Income Certificate जनरेट होण्याचा कालावधी हा कमीत कमी ३ दिवस तर जास्तीत जास्त १५ दिवस असतो.

           स्टेप ११. जस की स्टेप १० मध्ये सांगितलं कि Income Certificate जनरेट होण्याचा कमीत कमी कालावधी ३ दिवस तर तुम्ही ३ दिवसा नंतर तुमचे Account Log In करून, Your Transiion History मध्ये ‘ Current Status ‘ च्या खाली जर का तुम्हला “ Approved ” अस दिसत असेल तर तुमचे Income Certificate जनरेट झाल आहे.           स्टेप १२आता हे Certificate Download करण्यासाठी तुम्ही खालील कॉलम स्क्रॉल तुम्हाला तिथे ‘ Download Certificate ‘ अस Option दिसेल तिथे तुम्ही क्लिक करून तुमचे Certificate Download करून घ्या.  

                   मी वर दिलेली माहीती हि प्रत्येकाला केव्हा ना केव्हा कामात येणारीच आहे त्यासाठी हि माहीती तुम्ही खाली दिलेले share बटणाचा उपयोग करून हि माहीती Share करण्यास विसरू नका.
            अशाच प्रकारच्या सर्व माहिती जर का तुम्हाला मेल वर पाहिजे असल्यास तुम्ही माझ्या वेबसाईटची फ्री मध्ये सदस्यता घेऊ शकता त्यासाठी सदस्यता ह्या आयकॉन मध्ये तुमचा ईमेल ॲड्रेस प्रविष्ट करा. व सबमीट बटणावर क्लिक करून तुमच्या ईमेल आयडी चे Verification करून घ्या.

    (आजकाल आपण प्रत्येक जन बघतो की तलाठी ऑफिसमध्ये किती गर्दी असते. व ही गर्दी जास्त अश्या वेळेस असते जेव्हा शाळा, कॉलेज, चालू झाल्या असता. कारण शाळा व कॉलेज मध्ये जे काही जास्त करून कागदपत्रे लागतात ती सर्व कागदपत्रे तलाठी ऑफिस मधूनच बनवून मिळतात व त्यामध्ये अजून एक अडथळा येतो असा की दलाल. आता हे तर सर्वाना माहीतच असेल कि सामान्य माणूस किंवा ज्याला तलाठी ऑफिस मधील काहीच माहित नसते त्याला तर ते लुटण्यासाठीच बसले असतात. व आपल्याला पण अर्जंट मध्ये कागदपत्र लागत असता त्यामुळे काहीजण तर त्यांना जास्तीचे पैसे देऊन देतात. त्यासाठी मी प्रत्येकाला एकाच गोष्ट सांगत असतो वेळेआधीच आपण कोणतेही काम करून मोकळे व्हायचे म्हणजे आपली धावपळ होत नाही. व अशीच तुमची धाव पळ कमी व्हावी म्हणून मी तुम्हाला आजच्या पोस्ट मध्ये सांगितले आहे कि Income Certificate कसे काढावे तेही फक्त ३३.६० पैसे मध्ये. तुम्हाला ही पोस्ट वाचून खूप मदत होईल व तुम्ही हि पोस्ट आपले मित्र-मैत्रिणी मध्ये किंवा नातेवाईक यांना पण Share करू शकता जेणेकरून त्यांना पण अश्या माहितीचा फायदा होईल.)


मला Instagram वर Follow करण्यासाठी खाली दिलेल्या माझ्या नावावर क्लिक करा. यामुळे मी तुमच्याशी डायरेक्ट Connect राहू शकतो 

                      
                                           लेखक : भुषण सावंदे


Post a Comment

1 Comments

  1. sir hi information read karun mi income certificate sathi apply kel an majh certificate 4days madhye approve jhal thnx sir

    ReplyDelete