गाडीमध्ये इंजिन ऑईल कोणते वापरावे ? थंडीच्या दिवसांत गाडीमध्ये येणारे प्रॉब्लेम

                     इंजिन ऑईल कोणते वापरावे.


        थंडीच्या दिवसांमध्ये गाडी लवकर चालू करण्यासाठी काय करावे                वाचाकांहो आज तुम्हाला मी सांगणार आहे की तुम्ही गाडी मध्ये कोणते ऑईल वापरावे Branded की Unbranded 

              जर का तुमची बाईक थंडीच्या दिवसांमध्ये लवकर चालू होत नसेल तर हि पोस्ट पूर्ण वाचा.

        


            आताचे जग हे खूप वेगाने प्रगती करत आहे. आपणही आपल्या परिवारासोबत जगाच्या बरोबरीने चालण्यासाठी कुठे ना कुठे जॉब किंवा स्वतः चा छोटा किंवा मोठा व्यवसाय करतच असतो कारण आपल्याला पण दुनियासोबत चालायचे आहे अन त्यासाठी पैसा खूप महत्वाचा असतो व हा पैसा तर माणूस कमावतोच पण त्या सोबतच खूप गोष्टी बघाव्या लागतात.

                      त्यातीलच एक गोष्ट म्हणजे आपली गाडी व तिचा Maintenance वेळोवेळी करावे जेणेकरून आपण जेव्हा कुठे जात असतो तेव्हा आपली गाडी अचानक कुठे बंद पडायला नको. त्यासाठी सर्व जन तर Servicing करतातच पण तुमच्या सोबत पण अस होत असेल की तुम्हाला Emergency मध्ये कुठे अर्जेंट जायचे असते व अश्यावेळी तुमची गाडी लवकर चालू होत नसते. खास करून हिवाळ्यामध्ये तर हा प्रोब्लेम जास्तच जणवतो कारण तेव्हा आपली बाईक हि थंड झालेली असते, जेव्हा गाडीचे इंजिन गरम असते तेव्हा गाडी लवकर चालू होते. तुम्हाला माझ्या आजच्या ह्या पोस्ट मध्ये याचीच माहीती मिळेल की अस काय करावे की आपली बाईक ही हिवाळ्यामध्ये पण लवकर चालू व्हायला पाहिजे चला तर मग जाणून घेऊया.

   


 इंजिन ऑईल -  

                      आपण सर्वजन नेहमीच बघतो की टीव्ही वरील जाहिरातीमध्ये दाखवतात कि आमच्या कंपनी चे इंजिन ऑईल वापरा व तुम्हाला हा फायदा होईल तो फायदा होईल. व जवळजवळ सर्वच लोक अश्या जाहिरातींना बळी पडतात.....  गाड्यांच्या इंजिनमध्ये लुब्रिकेशन साठी लागणारे ऑईल हे बऱ्याचदा ब्रांडेड कंपनी चे वापरताना आपण बघतो. पण खरतर कोणतीही गाड्यांची कंपनी कोणत्या कंपनी चे ऑईल वापरावे याची शिफारस करत नाही. तर प्रत्येक गाडीच्या Manual Book मध्ये इंजिनसाठी लागणारे ऑईल हे कोणत्या ग्रेडचे किंवा कोणत्या प्रकारचे आवश्यक आहे. हे सांगितले असते. गाडी मालकाने किंवा इंजिन ऑईल टाकणार्याने ऑईल कंपनी न बघता ऑईल ग्रेड बघूनच इंजिन ऑईल वापरावे. प्रत्येक गाडीचे इंजिन ऑईल बनविताना एक विशेष सूत्राने ऑईल बनविले जाते. ते सूत्र म्हणजे ऑईल डब्यावर API, SAE, JASO अश्या नावाने ग्रेड दाखवली जाते. ही नावे असल्यास ते ऑईल शुद्ध आणि चांगल्या प्रतीचे आहे असे समजले जाते. 
   

5w30 किंवा 10w40 हे काय आहे –


            10w40 म्हणजे वातावरणातील तापमान 10 अंश सेल्सिअस एवढ कमी असेल तरीही हे ऑईल त्या थंड तापमानात गोठणार नाही. याचाच अर्थ कमी तापमानामध्ये ऑईल गोठू नये कारण जर का ते ऑईल गोठल तर चलनक्रिया कमी होऊन इंजिनवर वाईट परिणाम होतो व इंजिन वर वाईट परिणाम झाल्यास गाडी लवकर स्टार्ट होत नाही. अन जर का तुम्ही चुकीच्या ग्रेड चे इंजिन ऑईल वापरले तर ते थंडीच्या दिवसांमध्ये गोठून जाते व परिणामी गाडी लवकर चालू होत नाही.

यामधील W म्हणजे काय असत -

        
                यामधील W म्हणजेच Winter असा अर्थ आहे. w च्या पुढे 40 आहे. याचा अर्थ हा आहे की, हे इंजिन ऑईल वातावरणातील तापमान जरी 40° सेल्सिअस झाले तरी हे ऑईल गरम होऊन जळणार नाही. म्हणजेच 40° सेल्सिअस तापमानामध्ये पण हे ऑईल सुरक्षित पाने काम करेल असा याचा पूर्ण अर्थ आहे.


            म्हणजेच जेथील तापमान कमीत कमी 10° सेल्सिअस व जास्तीत जास्त 45° सेल्सिअस पर्यंत जावू शकते त्या भागातील गाडींसाठी खास करून 15w40 अश्या ग्रेड चे ऑईल उत्तम असते.  
  


         इंजिनमधे खासकरुन 10W30 , 10W40, 15W30, 15W40 अशा ग्रेडचे ऑईल इंजिनसाठी वापरणे योग्य ठरते, या व्यतिरिक्त 0W30 कींवा इतर ग्रेडचे ऑईल देखील वापरु शकता.
     
               दुकानदार हे नेहमी त्यांना जास्त फायदा असलेल्या कंपनी चे ऑईल विकताना दिसतात. पण कोणते ऑईल आपल्या गाडी साठी योग्य आहे हे knowledge असणे फार महत्वाचे असते

गाडी लवकर चालू व्हावी यासाठी कोणती Settings करावी –

   
           थंडीच्या दिवसांमध्ये गाडी लवकर चालू करण्यासाठी जर का तुमची गाडी सेल्स-स्टार्ट असेल तर सेल न मारता सुरुवातीला किक मारून चालू करून बघावे जेणेकरून गाडी गरम होण्यास मदत होते. अस करून पण जर का तुमची गाडी चालू होत नसेल तर गाडीचा Chauk ऑन करून ट्राय करावे. एवढे सगळे करून पण जर का रोजचा असाच प्रोब्लेम असेल खाली फोटो मध्ये दिलेली settings बघा

RPM Screw Settings –

      
                हा Screw तुमच्या गाडीच्या इंजिनचे पर मिनिट राउंड ला कंट्रोल करतो. याची सेटिंग तुम्ही तुमच्या आवश्यक्यतेनुसार थोडी चेंज करून शकता. तुम्ही योग्य प्रकारे याची Settings केल्यास तुमचा प्रोब्लेम दूर होऊ शकतो.    

       


Air Mixer Screw –

         
               हा Screw तुमचे गाडीचे पेट्रोल मध्ये थोडी काही हवा मिक्स करून गाडी चालवण्यास मदत करतो जेणेकरून तुम्हाला गाडीचा मायलेज उत्तम मिळतो. याची सेटिंग करून तुम्ही तुमच्या गाडीचा मायलेज वाढवू शकता -
 
      
            अश्याच प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही माझे  Telegram चॅनल जॉईन करुन घ्या. व हि माहीती सर्वांसाठी खूप उपयोगी आहे त्यासाठी तुमच्या मित्रमंडळी मध्ये ही माहीती Share करण्यास विसरू नका.                                          ©® लेखक : भुषण सावंदे

Post a Comment

1 Comments