Which Are Process To Get Corona Vacine - Corona Vacine आवश्यक कागदपत्रे

 कोरोना वरील लस नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे.

                
        



                 
                    कोरोनाची सुरुवात ही २०१९ च्या सरत्या वर्षी चीनमधून झाली तरी तिचा शेवट हा आपला भारत देश करेल यात आता शंका नाही. अन आता तो क्षण दूर नाही. जेव्हा आपला देश कोरोना मुक्त होईल, कारण सर्वाना माहीतच आहे की आपल्या भारतीय शास्रज्ञानी कोरोना वरील लस शोधून काढली अन ती आता वितरीत होण्यास देखील सुरुवात झाली आहे. पण ती लस घेण्यासाठी Appointment कुठून बुक करावी हे तुम्हाला माहीती आहे का. जर तुम्हाला माहीती नसेल तर ही पोस्ट खास तुमच्यासाठीच चला तर मग जाणून घेऊया.

              वाचकानो आपल्या भारत सरकारने एका डिजीटल पद्धतीने म्हणजे एक अप्प्लीकेशन डेव्हलप करून लससाठी Appointment बुक करण्याची सोय केली आहे . त्या अप्प्लीकेशन चे नाव आहे “कोविन” आहे. सध्या हे काही तांत्रिक कारणामुळे एप्लिकेशन्स आता उपलब्ध नाही आहे पण लवकरच ते उपलबद्ध होईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.

Cowin Aap डाऊनलोड, नोंदणी आणि इतर तपशील


        सध्या ते Aap डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध नाही आणि नागरिकांना त्याच्या उपलब्धेबद्दल अधिकृत स्रोताद्वारे सांगितले जाईल. असे पंतप्रधानांनी माध्यमांद्वारे सांगितले आहे. आरोग्य सेवा कर्मचारी आणि प्रत्यक्ष कोरोना आघाडीवर नसणाऱ्या सामान्य नागरिकांना लस घेण्यासाठी सरकारने ‘कोविन’ Aap ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. असही होऊ शकत कि माझी ही पोस्ट आज प्रकाशित व्हावी अन Cowin हे App Launch व्हाव. कारण लवकरात लवकर आपल्या देशामधून कोरोना आजाराचा नायनाट व्हावा अशी सर्वांची इच्छा आहे.

लस नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे


          या Aap वर लसीकरणासाठी नाव नोंदणी करण्यासाठी फोटो असणार ओळखपत्र हि मुख्य अट आहे. 
          

     
              याअंतर्गत, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, वाहनचालक परवाना, Pan कार्ड, मनरेगा रोजगार कार्ड, पेन्शनाची कागदपत्र, पासबुक, बँक अथवा पोस्ट ऑफिस चे पासबुक असे ओळखपत्राचे पर्याय सरकारन उपलब्ध करून दिले आहेत. हि ओळखपत्र स्कॅन करून नोंदणी आर्जाला जोडण आवश्यक असणार आहे. ओळखपत्राच्या अनेक पर्यायांपैकी जो पर्याय वापरून तुम्ही नोंदणी केलेली आहे. तेच ओळखपत्र प्रत्यक्ष लसीकरणाच्या वेळी सोबत आणणे गरजेचे असणार आहे. नोंदणीसाठी वेगळ अन प्रत्यक्ष लसीकरणाच्या वेळी वेगळ ओळखपत्र वापरण्याला परवानगी असणार नाही अस सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आल आहे.

               लसीकरणासाठी नोंदणी केल्यानंतर लसीकरणाची तारीख, वेळ आणि ठिकाण हे तुम्हाला SMS च्या माध्यमातून संबंधित व्यक्तीला कळवले जाणार आहे. लसीचे प्रत्येकी दोन डोस प्रत्येकाला घ्यावे लागणार असल्यान, दुसऱ्या डोसाच वेळ, तारीख. अन ठिकाण हे पण संबधितांना परत SMS करून कळवल जाईल. ही सर्व प्रकिया झाल्यानंतर क्युआर कोड स्वरूपातले प्रमाणपत्र लस घेणाऱ्या व्यक्तीस दिले जाणार आहे.  




             आपल्या सरकारने योग्य वेळी Lockdown लावल्यामुळे कोरोना महामारी आपल्या देशात इतर देशांच्या तुलनेने कमी पसरली अन सर्वच भारतीयांनी Lockdown ला उत्तम प्रतिसाद देऊन सरकारला मदत केली, खूप लोकांनी गरीब लोकांना जेवण वाटप केले, आरोग्य यंत्रणाने रात्रंदिवस खूप मेहनत केली, पोलीसांनी पण खूप मेहनत केली अश्या खूप बाबी आहे ज्याच्या मुळे आपला देश कोरोनाचा पराभव करण्यास सक्षम झाला. अन महत्वाच म्हणजे आपला देश फक्त आपल्याच लोकांना नाहीतर इतर देशांना देखील लस उपलब्ध करून देत आहे. म्हणून तर प्रत्येक भारतीय हा गर्वाने सांगतो की ‘मी भारतीय आहे’ 

     लस निर्माण करणारे सिरम इंस्टीट्युट अन भारत बायोटेक चे धन्यवाद 


अश्याच प्रकारची Latest महिती मिळवण्यासाठी आमचे Telegram चॅनल Join करा. 
 
  लिंक - https://t.me/lifestyleknow



Post a Comment

0 Comments