How To Check PF Balance – PF Passbook कसे Download करावे?

              PF म्हणजे काय व कसा चेक करावा ?


           मित्रानो आपण बऱ्याचदा न्यूज मध्ये ऐकतो कि PF चा इंटरेस्ट रेट सरकारने वाढवला / कमी केला. पण तुम्हाला माहीती आहे का PF म्हणजे काय असतो. व त्याचा आपल्याला काय फायदा असतो अन PF Balance कसे चेक करावे. तर मी तुम्हाला आजच्या ह्या पोस्ट मध्ये PF विषयी संपूर्ण माहीती सांगणार आहे. सोबत Screenshot देखील देत आहे. तसे स्टेप तुम्ही करून तुमच्या PF अकाऊंट चे balance चेक करू शकता तसेच तुमचे PF अकाऊंट Deactivate असेल तर ते तुम्ही कसे Active करावे याची देखील माहीती मिळेल.
   
      


                PF म्हणजे (Provident Fund) हा Fund अश्या व्यक्तींना लागू होतो जो सरकारी किंवा प्रायवेट नोकरी करत असतो. जसे तुमचे बँक अकाऊंट असते त्याच प्रमाणे याचे देखील अकाऊंट असते. व तुम्हाला याचे पासबुक देखील मिळत त्यामध्ये तुमचा PF किती जमा झालाय हे कळत आपल्या पगारातून जेवढे पैसे PF फंड मध्ये जमा होतात तेवढेच पैसे सरकार पण आपल्या PF अकाऊंट मध्ये टाकत असते. आणि जेवढा फंड जमा होतो त्यावर आपल्याला व्याजदर देखील मिळतो. Emergency च्या वेळेस आपण हा PF काढू शकतो तसेच रिटायर झाल्यावरही काढता येतो.

    >

PF अकाऊंट नंबर कुठुन मिळवावा -

   
               तुम्हाला तुमचा PF अकाऊंट नंबर हा तुमच्या Sallary Slip मधून पण मिळेल त्याला आपण UAN नंबर अस म्हणतो . जर तुम्हाला तेथून पण तुमचा PF अकाऊंट नंबर मिळत नसेल तर तुम्ही तुमच्या Register Mobile नंबर वरून खाली दिलेल्या मोबाईल नंबर वर Missed Call करू शकता, लगेच तुम्हाला SmS ने तुमचा UAN नंबर प्राप्त होईल अन जर का तुमचा मोबईल Register नसेल तर तुम्हाला Not Found चा SmS येऊन जाईल.

तुमचा PF जाणून घेण्यासाठी Missed Call करा – 011 22901406  

          How To Activate PF Account – तुमचे PF चालू कसे करावे –


        मी स्टेप बाय स्टेप सांगत आहे त्यापद्धतीने खाली दिलेले screenshot बघून स्टेप Follow करा 


1. सर्व प्रथम EPFO च्या Website वर जा. 
            लिंक - EPFO

            2. आता Service नावाच्या Tab वर क्लिक करून For Employees इथे क्लिक करा.

     3. आता Website च्या खाली जा तिथे तुम्हाला Member UAN Service (OCS/OTCP) असे दिसेल त्यावर क्लिक करा.


4. आता तुम्ही Screenshot मध्ये दिल्या प्रमाणे आले.


5. Website खाली स्क्रोल करून तिथे असलेल्या Activate UAN ह्या नावावर क्लिक करा .

     6. ह्या स्टेप मध्ये तुम्हाला तुमचे अकाऊंट Active करता येईल त्यासाठी UAN नंबर प्रविष्ट करा जो तुम्हाला मोबाईल वर SmS ने आलाय.


7. दिलेला कॅचपा टाकून Get Authorization Pin वर क्लिक करा 
      
     
8. तुम्हाला तुमचे अकाऊंट Activate झाल्याची Window आली व SmS पण आला असेल अकाऊंट Activate झाल्याचा.


How To Check PF Balance – पासबुक कसे डाऊनलोड करावे. 

1. आता सर्व प्रथम तुम्ही वरील स्टेप मधून मागे या खाली दिलेल्या Screenshot प्रमाणे.

    2. इथे तुम्ही Forgot Password वर क्लिक करून Password बदलून घ्या 


3. UAN Number टाका व नवीन बनवलेला Password टाकून Log In करून घ्या.


4. आता तुम्हाला इथे तुमची बाकीची Details पण तुम्ही भरू शकता जसे की E-Nomination 

             


5. Later या Icon वर क्लिक करा 


6. UAN Card येथे क्लिक करा. व पुढे तुम्हाला    Download इथे क्लिक करून तुमचे पासबुक डाऊनलोड करून घ्या. ह्या पासबुक मध्ये तुम्हाला चेक करता येईल कि तुमचा PF किती जमा झालाय अन सरकार किती टाकत आहे.

                मी वर दिलेली माहीती ही खूप उपयोगी आहे कारण तुम्ही जेव्हा Cyber Caffe वर जाता तेव्हा तुम्हाला तिथे पैसे मोजावे लागतात त्यासाठी मला वाटल कि हि माहीती जर का मी माझ्या Website वर टाकली तर तुमचे पैसे पण वाचतील अन तुम्हाला माहीती पण होईल कि पासबुक कसे डाऊनलोड करावे. तर मी आज वाचकांना एवढेच सांगेल कि तुम्ही या Service चा परिपूर्ण फायदा घ्या अन जो कोणी तुमचा सहकारी असेल त्याला पण हि माहीती शेअर करा जेणेकरून त्याला पण फायदा होईल. 

               अश्याच नव – नवीन माहितीसाठी आमचे Telegram चॅनल जॉईन करा.


                    आपल्या वाचकांसाठी मी माझ्या Website मध्ये एक नवीन Update आणल आहे ते म्हणजे Guest Post जर तुम्हालाही असे कंटेंट लिहायची आवड असेल तर तुम्ही तुमचे पोस्ट आम्हाला Guest Post व्दारे आमच्या पर्यंत पोहचवू शकता. लवकरच आम्ही तुमचे पोस्ट पण आमच्या Website वर Publish करत जाऊ. 


  
मला Instagram वर Follow करण्यासाठी खाली देलेल्या माझ्या नावावर क्लिक करा.


  
                                                  ©® भुषण सावंदे   

Post a Comment

0 Comments