Investment Knowledge In Share Market
आजच्या पोस्ट मध्ये शिकायला मिळेल कि शेअर चे
Technical Analysis कसे करावे. अन काय बघून शेअर मार्केट मध्ये कोणते शेअर विकत घ्यावे याची संपूर्ण माहीती तुम्हाला मिळेल. वाचाकांहो मी असे खूप लोक बघतो कि ते कोणाच्याही फसव्या सल्ला घेऊन शेअर विकत घेेऊन अन लॉस घेतात. ह्या सर्व गोष्टीना आला घालण्यासाठी आपल्या लोकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी माझा हा एक छोटासा प्रयत्न. चला तर जाणून घेऊया कि कुठले शेअर अन काय बघून विकत घ्यावे. आपण ह्या पोस्ट मध्ये बघणार की Possional म्हणजे एका महिन्या च्या Invest साठी काय बघून शेअर Buy घ्यावे. वाचाकांहो शेअर विकत घेण्याचे खूप प्रकार आहे. ते मी माझ्या मागच्या post मध्ये आधीच सांगितले आहे. जर का तुम्हाला ते प्रकार माहीती नसतील तर तुम्ही ते वाचण्यासाठी पुढील लिंक वर
क्लिक करा
एक महिन्यासाठी इंवेस्ट कारायची असेल तर शेअर मध्ये आपल्याला PE Ratio (Price To Earning Ratio), शेअर ची Intrainsic Value / Undervalued Stock, Moving Average, Technical Indicators, इत्यादी बघून पण तुम्ही तुमचे पैसे शेअर मार्केट मध्ये लावले न तरी तुम्ही १०-२०% च्या वर किंवा आत नफा (Profit) मिळवू शकता.
शेअर मार्केट मधील गुंतवणुकीचे गुपित म्हणजे—
कधीही कोणाला जर शेअर मार्केट मध्ये यशस्वी व्हायचे असेल तर एक अमेरिकी गुंतवणूकदार – जोएल ग्रीनब्लाट नेहमी हेच सांगतात कि ज्या शेअर ची किमत त्याच्या वास्तविक किंमातीपेक्ष्या कमी असेल तर तो शेअर नक्कीच तुम्हाला दीर्घ कालावधीसाठी चांगला Profit मिळवून देईल.
ज्या शेअर चा PE Ratio हा त्याच्या सेक्टर च्या PE Ratio पेक्ष्या कमी असेल तर असा शेअर तुम्हाला नक्कीच चांगला नफा मिळवून देईल खाली दिलेल्या Screenshot बघून तुम्ही अंदाज लावू शकता. या screenshot मध्ये शेअर चा PE Ratio हा त्याच्या सेक्टर च्या PE Ratio पेक्ष्या कमी आहे. तर ह्या शेअर ने १ महिन्यामध्ये २४.३४% चा Returns (नफा) दिला आहे. Screenshot मध्ये मी मार्क केले आहे ते बघावे.
(जर तुम्ही ह्या शेअर मध्ये १ महिन्यासाठी १ लाख रुपये लावले असते तर तुम्हाला साधारण २४०००/- रु चा नफा झाला असता.)
ह्या पोस्ट मध्ये मी ही सर्व माहीती फक्त Educational च्या उद्देशाने सांगत आहे. आम्ही कुठलेही शेअर खरीदी विक्रीचा सल्ला देत नाही याची तुम्ही नोंद घ्यावी.
Technical Indicators मध्ये सर्वत्र उपयोग केला जाणारा एक Indicator म्हणजे
Screenshot मध्ये दाखवल्याप्रमाणे जेव्हा Black Line ही Red Line ला वर क्रॉस करते तेव्हा समजायचं की शेअर ची किंमत वाढणार आहे. अन जेव्हा हीच प्रक्रिया उलट होते तेव्हा समजायचं कि शेअर ची किंमत कमी होईल.
( काही Indicators हे Demand & Supply ह्या तत्वावर कार्य कारतात जेव्हा Demand वाढते तेव्हा शेअर ची किंमत देखील वाढते अन जर का Supply वाढला तर शेअर ची किंमत कमी होते.)
RSI (Relative Stranth Indicator)
हा Indicator
OverBought अन
OverSold हे दर्शवतो जर का RSI 80 च्या आसपास असेल तर त्याला OverBought झोन समजले जाते याचा अर्थ असा कि शेअर ची किंमत केव्हावी कमी होऊ शकते पण ह्या मध्ये खूप वेळेस अपवाद पण होत असतो कारण हा Indicator Demand&Supply वर कार्य नाही करत हा Indicator फक्त शेअर ची स्ट्रेन्थ दाखवतो. अन जर का हा Indicator OverSold झोन
म्हणजेच 20 च्या आसपास. असेल तर तुम्ही इथून शेअर Buy करू शकता म्हणजेेच इथून शेअर ची किंमत वाढण्याची शक्यता असते.
तुम्ही MACD हा Indicator देखील बघावा. जेणेकरून तुम्हाला Confirmation मिळेल कि इथून शेअर ची किंमत वाढेल का कमी होईल.
शेअर चे Technical Analysis करण्यासाठी सर्वत्र हे २ प्रकारचे Indicator जास्त प्रमाणात वापरले जातात. तसे बघितले तर खूप सारे Indicator उपलब्ध आहेत. जसे की- ADX, Boliger Band, Klinger, Oscillater Movement, Pivot Point, ATR Band, Alligator, Moving Average, इत्यादी
Intrainsic Value / Undervalued Stock
Intrainsic value बघून जर का तुम्ही शेअर विकत घेतले तर तुम्हाला ह्यामध्ये नक्कीच चांगला नफा मिळेल. तुम्ही कुठल्याही शेअर ची Intrainsic Value चेक करू शकता TickerTape ह्या अप्प्लीकेशन मध्ये. अजून तुम्ही इथे कोणत्याही शेअर चा PE Ratio, PB Ratio बघू शकता. इथे तुम्ही कोणत्या शेअर मध्ये आपला Entry Point योग्य आहे हे देखील बघू शकता.
Undervalued Stock जर का तुम्हाला शोधायचे असेल तर तुम्ही इंटरनेट वर उपलब्ध असलेले Screener चा वापर करून Undervalued Share शोधू शकता. Undervalue Stock म्हणजेच हेच की शेअर हा त्याच्या वास्तविक किंमत पेक्षा कमी आहे हे बघणे. साधारण सर्वच मोठं मोठे इंवेस्टर ह्याच तत्वाचा उपयोग घेतात. Undervalued शेअर हे दीर्घ कालावधीसाठी खूप मोठे रिटर्न्स देतात. जसे की 1000% - 1200% रिटर्न्स
Undervalued Stock Screener लिंक - Undervalue Stock Screener Click Here
तर शेअर मार्केट बद्दलची पोस्ट हि खूप Knowledgble असल्यामुळे तुम्ही तुमच्या मित्र-मंडळीमध्ये शेअर करण्यास विसरू नका जेणेकरून अश्या माहितीचा त्यांना देखील उपयोग होईल. आपल्या मराठी लोकांना शेअर मार्केट बद्दल जागृत करण्यासाठी हि पोस्ट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेअर करण्यास विसरू नका.
खूप लोक मला Mail वरून किंवा
Instagram वर Contact नंबर मागत असता पण प्रत्येकाला मला नंबर देणे शक्य नाही, त्यासाठी मी Instagram वर तुमचा sms चा Reply देण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो, अन जर का कोणाच्या sms चा Reply द्यायला विलंब होत असेल तर क्षमस्व. कारण माझ लक्ष्य आहे. आपल्या संपूर्ण मराठी लोकांना सोबत घेऊन चालणे. त्यासाठी मी Telegram वर Channel देखील बनवले आहे त्यात तुम्ही
Join व्हाच. चला तर आपल्या महाराष्ट्राला अधिक आर्थिक साक्षर बनवूया.
Telegram Channel लिंक – https://t.me/lifestyleknow
फ्री मध्ये
Website ची सदस्यता घ्या.
2 Comments
sir can you say me best share of this time
ReplyDeleteBuy Wipro for Lifetime is IT Sector Stock
Delete