घरीबसून स्टेट बँकेची ची इंटरनेट बँकिंग सेवा अश्या प्रकारे करा सुरु
खूप लोकांकडे स्टेट बँके मध्ये अकाऊंट आहे. अन त्यांना छोट्या-मोठ्या कामांसाठी बँकेमध्ये जावे लागते. यामध्ये लोकांचा वेळ, पैसा जातो. अन बँकेमध्ये जर का गर्दी असेल, तर खूप वेळ रांगेमध्ये पण उभे राहावे लागते. ह्या सर्व गोष्टींपासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर तुम्हाला उपयोगी ठरेल स्टेट बँकेची इंटरनेट बँकिंग ही डिजीटल सेवा. सोबतच तुमचे स्टेट बँकेमध्ये अकाऊंट असेल, तर तुम्ही YONO SBI ह्या Aap मध्ये लगेच तुमचे अकाऊंट
Log In करू शकता.
1. ऑनलाइन पैसे ट्रान्स्फर करणे.
2. बँक Balance चेक करणे.
3. IMPS आणि NEFT ने पेमेंट करणे.
4. तुमच्या अकाऊंट चे स्टेटमेंट डाउनलोड करणे.
5. काही प्रोब्लेम आल्यास अकाऊंट ट्रान्स्फर करणे.
6. मोबाईल रिचार्ज, बिल भरणे, इत्यादी
7. E-Nomination, आधार माहीती अपडेट करणे.
8. इत्यादी कामे तुम्ही इंटरनेट बँकिंग ने करू शकतात.
इंटरनेट बँकिंग चालू करण्यासाठी तुमच्या कडे ATM, बँक अकाऊंट ची संपूर्ण माहीती किंवा जवळ पासबुक असणे, तुमच्या बँक अकाऊंट ला मोबाईल नंबर लिंक असणे, इत्यादी गोष्टी असणे सर्व तुमच्या जवळ असणे गरजेचे आहे.
3. New User Registration इथे क्लिक केल्यावर तुमच्या समोर स्क्रीनशोट मध्ये दाखवल्याप्रमाणे विंडो ओपन होईल.
(ज्यानी बँकेत जाऊन इंटरनेट बँकिंग चा फॉर्म भरला आहे, तर बँक त्यांना एक किट देते. ज्यांना अश्या प्रकारचे कीट भेटले आहे त्यांनी हि प्रोसेस करू नये. त्यांनी डायरेक्ट नेट बँकिंग साठी Log In करावे.)
Related Posts
4. आता पुढे Ok या पर्यायावर क्लिक करा.
5. समोर आलेल्या विंडो मधून New User Registration पर्याय सिलेक्ट करावा, अन
Next वर क्लिक करावे.
7. त्या फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण Details भरा.
जसे की –
o Account Number
o CIF Number
o Branch Code
o Country
o Register Mobile Number
8. यानंतर फॉर्म मध्ये दिलेला कोड भरून
Submit या पर्यायावर क्लिक करा.
9. जसे मी तुम्हाला सांगितलं होत कि तुम्हाला तुमच्या अकाऊंट मध्ये लिंक असलेल्या मोबाईल नंबर ची गरज लागेल. आता त्या मोबाईल नंबर वर तुम्हाला एक OTP आला असेल तो तिथे प्रविष्ट करुन Confirm या पर्यायावर क्लिक करा.
(एखाद्या वेळेस OTP लवकर येत नाही त्यासाठी तुम्ही थोड्या वेळ वाट पाहू शकता, तरीपण OTP येत नसेल तर Resend ह्या पर्यायावर क्लिक करा.)
10. OTP टाकल्यानंतर तुमच्या समोर तुमच्या ATM कार्ड बद्दल विचारलं जाईल. Screenshot मध्ये बघा अश्या प्रकारची विंडो येते.
“ I Have My ATM Card या पर्यायावर सिलेक्ट करून Submit या बटनावर क्लिक करा.
(जर का तुमच्याकडे ATM कार्ड नाही आहे, तर तुम्ही फक्त बँके मध्ये जाऊनच इंटरनेट बँकिंग चालू करू शकता.)
11. आता तुमच्या समोर जी विंडो ओपन झाली त्यामध्ये तुम्हाला तुमचे ATM कार्ड चे थोडे नंबर दाखवले जातील. तेथे तुमचे ATM कार्ड सिलेक्ट करून
Confirm ह्या पर्यायावर क्लिक करा.
12. यानंतर तुम्हाला तुमच्या ATM कार्ड ची माहीती विचारली सर्व माहीती टाकायची आहे. दिलेला कोड भरून
PROCEED ह्या पर्यायावर क्लिक करा.
13. खाली Screenshot मध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला विंडो दिसेल
Succesfully Registered For Internet Banking. पुढे
Close ह्या पर्यायावर क्लिक करा.
14. यानंतर तुम्हाला तुमचे इंटरनेट बँकिंग चे Username आणि Password सेट करावा लागेल. (तुमचे Username अन Password हे लक्ष्यात राहील, असेच अन मजबूत असलेला Password ठेवावा. तसेच तुमचे Username अन Password हा तुम्ही गुपित ठेवावा कधीही कोणालाच शेअर करू नये.)
15. आता तुम्ही SBI च्या मेन पेज वर जाऊन तुमचे अकाऊंट
Log In करून घ्या.
16. Log In झाल्यानंतर
My Accounts&Profile इथे क्लिक करून Set Password मध्ये क्लिक करून तुमचे बँक अकाऊंट चा पण एक मजबूत Password तयार करून घ्या.
मित्रानो इंटरनेट बँकिंग कडे खूप लोक दिवसेंदिवस जात आहेत. अन आता तर न शिकलेले लोक पण इंटरनेट बँकिंग हाताळताना दिसतात. इतके आताचे युग हे डिजीटल झाले आहे. पण ह्या डिजीटल युगामध्ये वाईट गोष्टीपण खूप वाढत आहे. जसे कि ऑनलाईन पैशांचा गैरव्यवहार, परस्पर पैसे ट्रान्स्फर होणे, अश्या खूप वेगवेगळ्या घटना घडत आहे. मी नेहमी माझ्या वाचकांना सांगतो कि तुम्ही जर का इंटरनेट बँकिंग चा पर्याय वापरत असाल तर तुम्ही तुमचे इंटरनेट बँकिंग चे अकाऊंट Official वेबसाईट वरूनच Log In करावे. वेळोवेळी तुमच्या अकाऊंट चा Password चेंज करत राहावा.
तर वाचाकानो कशी वाटली ही माहीती तुमचे असे काही मित्र-मंडळी असतील ज्यांना बँकेमध्ये खूप काम पडत किंवा तुम्हाला पण बँकेचे थोडे फार का असेना काम पडत तर तुम्ही पण हि माहीती अश्या लोकांना शेअर करून त्यांचा पण फायदा करू शकता.
1 Comments
thanks sir nice information . complete my Internet Banking
ReplyDelete