साथ हवी मला तुझीच भाग 4


साथ हवी मला तुझीच भाग 4




 भाग 3 पासून पुढे ...





त्याने सत्या कडे पाहिले तर ती त्याच्याकडेच बघत होती .

नजरेला नजर मिळताच ती इकडे तिकडे बघायला लागली तिच्या वागण्यावर त्याला हसू आले.
मग न राहवून तिला त्याच्या चेहरा ओळखीचा वाटत होता . 
कुठेतरी पाहिलेलं वाटतं. विचारू का .... ना ना विचारलं तरी हा काय बोलणार ...उगीच काहीही अर्थ काढेल विचारण्याचा .




तिच्या चेहऱ्याने ती मनात खूप काही विचार करते आहे असच वाटतं होत .तो शांततेत डोळे लावून गाने ऐकायला लागतो.




प्रवास सुरू होता .....काही वेळाने संध्याकाळ ची शीतल हवा अंगाला स्पर्शून गेली ....अन् सत्या पण डोळे बंद करून त्या निसर्गाला अनुभवत होती.





काही वेळाने बस थांबली एका ढाब्यावर.
सर्व बसमधून खाली उतरले .तोच रोहित चा फोन वाजला आणि फोन वरचे नाव बघत तो गंभीर झाला .



पलीकडून....."हॅलो "

रोहित,"हा बोला ना."

......"काय बोला ....सांगितलेले काम केले की नाही ."

रोहित ,"मी देतो तुम्हाला माहिती गावी गेल्यावर बरीच माहिती मिळेल पण तुम्हांला ही माहिती मिळून काय मिळणार ."

....... "त्याचा विचार तू नको करू आणि तुझी खरी ओळख नको कळू देऊ त्या देसाई ला."

रोहित,"मी त्यांना वडिलांचे नाव सांगितले नाही पण गावाचे सांगितले ."

......."गावाचे नाव पण कशाला सांगितले मूर्खा दुसर काही सांगितले असते ."


रोहित ," हे बघा सत्या आणि मी एकाच कॉलेज ला होतो 
मी माझी Identity तुमच्या ह्या गुप्तहेरीत पणाला नाही लावू शकत .पण मला अस वाटत सत्या देसाई तुम्ही म्हणता ती व्यक्ती नाहीये.


......." तसंच असो नाहीतर अजून एक खून होईल ,"


तो माणूस क्रूर हसत बोलला .
आणि
इकडे रोहित ला दरदरून घाम फुटला.
 



"ते...तू...तुम्ही अस काहीच करणार नाही हा ती फ्रेंड आहे माझी ".



"बाळा जास्त जिगरी नको होऊ. लक्षात ठेव एकदा सत्य कळलं तर तिला कुणीच वाचवू शकत नाही ."
 



आणि कॉल कट झाला .

तो तसाच फोन कानाला लावून होता .त्याला कुठेतरी आपण खूप मोठी चूक करतोय हे जाणवायला लागलं.त्याच्या खांद्यावर कुणाचा तरी हात पडला तसा त्याच्या हातातला फोन खाली पडला .मी फिरून पाहिल तर रितिका होती .




"काय रे इथे काय करतोय एकटा चल मस्त कडक चहा पिऊ या ....एक मिनिट तुला इतका घाम का आलाय इथे तर खूप थंड वाटतेय ".


तिने काही ऐकलं नाही म्हणून रोहित मनोमन शांत झाला .
" अगं मी पाणी मारले तोंडावर त्यामुळे ...चल चल चहा थंड होईल.



इथे बस वर सत्या मस्त पाठीमागे टेकून एक डुलकी मारत होती .तितक्यात तिला तिच्या आई चा आवाज आला .




"सत्या खाली उतर आपण थांबलोय,हे देवा ही पोर रस्त्यात बस वरून पडली तर नाय.......अहो हिला किती आवाज दिले पण खाली आली नाही .....जर बघा बरं बस वर आहे की"....सत्याची आई घाबरून गेली 





खालचा आवाज ऐकून सत्या response देत नाही पाहून हळूच तो मुलगा बाजूला झाला कारण ती त्याच्या पाठीवर ठेऊन झोपली होती .तो बाजूला होताच सत्या आपण पडतोय असा भास होऊन खडबडून उठली .
आपण याला टेकून झोपून गेलो होतो याचे तिला नवल वाटले.त्याने तिला खाली जाण्याचा इशारा करे पर्यंत तिने तिथून पळ काढला .



ती गेल्यावर तो खूप वेळ तिचाच विचार करत हसत होता.
पण 
लगेच आपण तिला गमावणार तर नाही ना ही भीती दाटून आली.
 


सत्या दिसताच तिच्या आईने देवाचे आभार मानले .
 
"सत्या केव्हाची आवाज देतेय ."

"आई मी झोपले होते ग " सत्या आळस देत बोलते .

"काय sss अगं तू खाली पडली असती तर ....बघ हो ही"

"आई आता नको please मला चहा घेऊ दे आधी डोकं दुखतेय जरा"

तिच्या आई ने नकारार्थी मान हलवत डोक्याला हात लावला .



"हे सुमी ताई तिथे आपण कुठे थांबणार म्हणजे जिजुंच्या घरी की दुसरी कडे .."रितिकाने खाता खाता विचारले .

"
हो आपण दुसरी राहणार आहोत 
तिथे यांचाच एक अजून वाडा आहे .तिथेच राहणार आपण ."
सुमी ऊर्फ स्मिता चहा पित पित बोलली .



सत्या ..." ताई अगं गावाचे नाव तरी काय आहे ."



सुमी ," वाह beta गावाला पोहचल्यावर विचारलं असतं की,राजवाडी नाव आहे गावच.


सत्या ," राजवाडी ".



नाव ऐकून सत्या हे नाव आधी पण ऐकल्या सारखे वाटले 
अन् नकळत मनात हुरहुर दाटून आली .


आनंद शांत पणे तिला बघत होते .सध्या त्यांच्या मनात विचाराचा काहूर उठला होता ....मी हे ठीक करतोय ना देवा माझ्या सत्याला खरं कळल्यावर ती कस तोंड देणार , खचणार तर नाहीना .तिचा जीव धोक्यात टाकतोय मी देवा तीच रक्षण करण्याची ताकद दे मला ......त्यांना न्याय द्यायचा आहे.ते गुन्हेगार अशे मोकाट नाही फिरू शकत .....सत्याचे अस्तित्व हिरवणाऱ्या ,तिचे .......त्यांना शिक्षा झालीच पाहिजे .आधी मी एकटा होतो पण आता तो आहे माझ्या साथीला .ती वेळ त्यांची होती पण आता वेळ आमची आहे .





©®शब्दयोगी 
Yogini Chaudhary

Post a Comment

0 Comments