साथ हवी मला तुझी..
भाग 2
रहस्यमय आणि प्रेम कथा.
भाग 1 पासून पुढे.....
रितिका: काय रे तु पण....
रोहन : thank you so much .
सत्या : तुम्हांला मी बोलले होते ना सुम्मी दीदी च्या लग्नाचं......तर next week मध्ये आहे सो दीदी ने तुम्हांला दोघांना invite केलंय ....तसा ती call करणारच आहे पण मी तुम्हाला आधीच कल्पना देते.
रितिका रोहन कडे नाक फुगवुन बघते.......सत्या या दोघांची तु तु मै मै बघत असतें.....तोच तीच लक्ष एका corner च्या table वर जातं....एक माणुस तिथे केव्हाचा बसला होता.....डोक्यावर टोपी आणि कानात हेडफोन घातले होते .....हातात एक ब्रँडेड वॉच .....तो व्यक्ती समोर असलेल्या मॅगझीन वाचत होता...coffee चे चार cup side ला टेबलं वर होते......सत्या ला थोडं विचित्र वाटल.....तीच नकळत लक्ष त्या माणसावर जात होत....मधून मधून तो व्यक्ती बोलत होता.....पण त्याच्या टेबल वर त्याच्या शिवाय कुणी नव्हतं......त्याने डोळ्यावर चष्मा घातला होता.....तो मध्ये मध्ये कानातल्या हेडफोन्स ला हात लावत होता.......रोहन सत्याच लक्ष कुठे आहे हे बघण्यासाठी ती बघत असतें त्या दिशेने बघतो.......त्या माणसाला बघून रोहन च्या चेहर्याचा रंग उडतो.....तो मुद्दाम वेटर ला बोलावतो. रोहन सत्याच लक्ष आपल्या कडे करण्याचा प्रयन्त करतो.
रोहन : हेय सत्या मी म्हणतो तु मला गावाचं नावच नाय सांगितलं.....म्हणजे मला कोणतंही असो गाव चालत पण हि रीती ला प्रॉब्लेम असतो.
सत्या तरी पण रोहनच्या बोलण्याकडे लक्ष देत नसते.
रोहन तिला हलवत बोलतो......तस सत्या त्याच्याकडे बघते.......
रोहन : काय ग लक्ष कुठेय तुझं.....केव्हाचा बोलतोय........
सत्या : अरे बघ तो माणुस ...थोडा विचित्र नाय वाटत का तुला....
रोहन : कुठे विचित्र.....काही पण असं कुणावर लक्ष ठेवता का.....काही कामं नाहीये का तुला....आपल्याला काय करायचे .....
सत्या : हा ...ते पण आहे....
रितिका : by the way रोहन तु पण गावाकडचा आहे ना.....म्हणजे कोणत्यातरी गावचा आहे ना....पण आम्ही कधी विचारलं नाही तुला.....
रोहन : हो मी सीतापुर चा आहे पण काही वर्षापुर्वी बाबांनी सोडलं ते गाव....पण एक सांगतो गावाकडे राहणे हे नशीबवाल्यांना मिळते.....मला लहानपन खुप आठवते ग ...पण कधी पुन्हा गेलोच नाय.....म्हणून मी सत्या तुझ्या दीदी च्या लग्नासाठी खूप excited आहे......
सत्या: गाव का सोडलं....म्हणजे काही प्रोब्लम होता का....
रोहन :माहित नाही ग ....पण काहीतरी झालं होत जे मला नाही माहित.....गावाकडे बाबा जात असतात कधी कधी.....
सत्या : अन तु नाय जात....
रोहन : नाही नेत मला ते.....पण आता जायला मिळणार माझं गावी नाही पण दुसऱ्या कोणत्याही गावी तर जाऊ ना.
सत्या : हम्म बघू.....तुम्ही येणार ना नक्की...मी बाबाना सांगते तुमचंही तिकीट बुक करायला.
रितिका : हो पण गावाचं नाव काय...?
सत्या : ते तर मलाही नाही माहित....मी विचारायला विसरले.
रोहन : वाह्ह....क्या बात है................जायचय पण ठिकाणाचा पत्ता नाय....
सत्या : गप्प रे विचारते घरी मग सांगते तुला .
रोहन ,रितिका आणि सत्या कॅफे च्या बाहेर निघतात.
पार्किंग मधून सत्या आपली स्कुटी काढते....आणि स्टार्ट करते....पण स्कुटी चा पुढच टायर पंचर असतें.
तिच्या हे लक्षात येते....
शीट आता काय करू पैसे तर सर्व कॅफे मध्ये संपले........सत्या वैतागुन आणि गेली असते....कारण पैसे संपले असतात. रितिका आणि रोहन तिथून निघून गेले असतात......ती आता पार्किंग मध्ये एकटी असतें.......ती स्कुटी तिथेच ठेवून निघू लागते.....तोच तिला कुणीतरी आपल्या पाठी असल्याच जाणवते.....ती सतर्क होते...मागे वळून बघते तर कुणी नसतं .....समोर बघून पुन्हा चालू लागते........कुणी तरी तिचा हात पकडत ती तोच हात घट्ट पकडत मागे वळते.....ती व्यक्ती ज्याने हात पकडला असतो ती एक 8 वर्षाची मुलगी असतें ......
ती मुलगी : आई .....दीदी दुखतोय हात माझा....
सत्या : सॉरी सॉरी....तु असं लपून माझा पाठलाग का करत होतीस...कोण आहेस तु.
ती मुलगी : दीदी मी इथे पार्क मध्ये खेळत होती ...तिथे एक दादा आला आणि त्याने मला हे कार्ड तुला द्यायला सांगितलं......
सत्या : कोण दादा ...आणि तु मला कसं ओळखलं
ती मुलगी : त्या दादा ने तुझा फोटो दाखवला ...आणि बोलला कि तुझी स्कुटी blue colour ची आहे आणि ती त्याने पंचर केली आहे....
सत्या : कायय....त्याची येवढी हिम्मत कोण आहे तो अन कुठे आहे...
ती मुलगी : तो म्हणे कि तु माझ्या विषयी विचारेल तेव्हा तिला म्हणा कार्ड वाच .....जास्त राग चांगला नसतो.
असं म्हणून ती मुलगी सत्या च्या हातात ते कार्ड ठेवून पडून जाते.....सत्या त्या मुलीला थांबवणार तोच ती मुलगी निघून जाते.
सत्या ते कार्ड उघडते त्यात वर सॉरी लिहिलं असतें.
sorry
तुझी स्कुटी मीच पंचर केली आहे.......हे वाचून सत्या चा चेहरा लाल होतो.....ती पुढे वाचते....आता चेहरा लाल नको करू आणि कार्ड पूर्ण वाच ......असं वाचताच जरा जास्तच राग येतो.....कार्ड ती वाचायला लागते....hii.... मी कोण हे तुला पुढे माहिती होणार आणि तु मला ओळखते so dont worry.... फक्त एकच। काळजी घे स्वतःची .....
तुला एक सांगायचंय जे दिसत तस नसत म्हणून जग फसतं .........आणि हो लवकर ये मी वाट बघतोय......तु छान खेळतेस....आज एकदम छान खेळलीस .....अभिमान वाटतो तुझा.......खूप प्रश्न पडत असतील ना......पडू दे मलाही पडले होते...आणि त्यांची उत्तर मला मिळाली तुला हि मिळतील....पण अजून तुझे प्रश्न वाढू दे....त्यांची उत्तर पण तेव्हाच मिळतील.....आणि हो तु जिथे जाशील तिथे मी असेलच असं नाही ....जरा सांभाळ येवढा राग चांगला नसतो...आता तु विचार करत असशील कोण हे ध्यान .....जो तुला इतक चांगलं ओळखतो.....ओळखते तु मला पण आता विचार नको करू....पुढच्या week ला भेटू आपण ...नक्की ये बर .....आणि हो मी काही गुप्तहेर नाही किंवा कोणी रोड छाप रोमिओ नाही बर....मी एक हित चिंतक आहे तुझा.....बस.....
take care ......
ते कार्ड वाचुन ती shock झाली ....तिला काहीच कळत नसत.
दुरून कोणीतरी तिला बघत असत....हो तीच व्यक्ती जिने तिचा फोटो काढला असतो क्रिकेट च्या ग्राउंड वर असताना .....त्या व्यक्तीने परत त्याचा कॅमेरा काढला आणि सत्या चे फोटो बघू लागला.
आता लवकर ये सत्या ....कुणाला तरी न्याय मिळवून द्यायचा आहे .......
त्याला कुणाचा तरी फोन येतो....
........हा बोला काका
.........तु कामं केलं ना.
.........हो काका ..तुम्ही सांगितल्या प्रमाणे.
.........thank you बेटा....तुझी खूप मदत झाली
.........काका मी उद्या निघतोय। तुम्ही येणार आहात ना...
........हो हो वेळ आली आहे.....त्यांना न्याय देण्याची.
.......हो काका फक्त सत्याची काळजी घ्यावी लागेल
ते लोक कसे आहेत माहित आहे ना .
.......हो...मी त्याबाबत सतर्क आहे ....भेटू आपण बाय..
......बाय.
त्याने फोन ठेवला आणि एक वेळ सत्या कडे बघून निघून जातो.
असतात काही गूढता नात्यात हि
सत्यात दिसते ते सत्य हि
असते जिथे मनाचे नाते
तिथे भास हि मनाला मनाचे......
To be continue........




0 Comments