Cell Phone जामर कसे बनवावे, सेल फोन जामर काय आहे

                   सिग्नल जामर बनवणे
   
 

  Cell Phone Jammer काय आहे व कसे काम करते.


    
               Cell Phone jammer काय आहे याच्या नावामुळेच तुम्ही समजून गेले असतील की हे काय आहे. हे अस एक Device आहे जे मोबाईल सिग्नल, किंवा Wi-Fi सिग्नल , इत्यादी प्रकारचे सिग्नल हे थांबवून ठेवते. याचा उपयोग लोक चांगल्या कामासाठी पण करतात व वाईट कामासाठी पण करतात. खूप वेळेस तुम्ही अनेक Movies मध्ये, किंवा Serials मध्ये पण याचा वापर करताना बघितलं असेल. यावरून प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न नेहमी येत असेलच कि हे सिग्नल Jammer काय आहे, कसे काम करते, कसे बनवावे किंवा कुठून विकत घ्यावे.

      


  Cell Phone Jammer आहे तरी काय :

                     सेल फोन jammer हे एक अस Device आहे जे सर्व प्रकारचे सिग्नल जाम करते त्यामध्ये पण खूप प्रकार आहे. ज्याला जे सिग्नल थांबवायचे असतील तो तश्या प्रकारातील Network जामर घेतो. सेल फोन जामर जिथे तुम्ही चालू केले त्या एरिया मधील (ठराविक रेंज) सिग्नल ते थांबवून ठेवत. व एकदा का सिग्नल जाम झाले तर तुम्ही कुठल्याच प्रकारे सिग्नल मिळवू शकत नाही जर का तुम्हाला सिग्नल परत मिळवायचे असतील तर तुम्हाला आधी ते सिग्नल जामर शोधून त्याला बंद कराव लागेल. सिग्नल जामर चालू असल्यास तुम्ही Call , SMS , किंवा इंटरनेट Access नाही करू शकणार .

            


( मी ह्या पोस्ट मध्ये पुढे थोडक्यात सांगितलं आहे कि सेल फोन जामर कसे बनवावे जर का तुम्हाला बनवायचे असेल तर तुम्हाला Electrical मधील पण थोड फार Knowledge असावे. अस नाही कि तुम्ही पोस्ट वाचली व जामर बनवून टाकाल. ह्या पोस्ट मध्ये मी हि सगळी माहीती Education च्या उद्देशाने देत आहे. तुम्ही त्याचा कसा उपयोग घ्याल याचा आमच्या Website शी काहीही संबंध नाही.)



  सेल फोन Jammer कार्य कसे करते :

          सेल फोन कोणता पण असो हे फक्त एकाच कन्सेप्ट वर काम करत आपल्या आजूबाजूला येणारे वा जाणाऱ्या सिग्नल्स ना थांबवन/रोखून ठेवणे. मग सिग्नल कोणता पण असो मोबाईल चा असो किंवा रिमोट चा.

             आपण इथे मोबाईल चे उदाहरण घेऊ. मोबाईल ह एक Duplex Device आहे. आपण याच्यावर एकाच वेळेस बोलू पण शकतो व ऐकू पण शकतो. जेव्हा आपण कोणत्या व्यक्तीला Call करतो तेव्हा त्या वेळेस आपल्या मोबाईल चे सिग्नल हे जवळच्या टावर वर जातात. अन जर का तुम्ही असलेल्या ठिकाणी सेल फोन जामर चालू असेल तर ते जामर तुमच्या सेल फोन च्या सिग्नल ला थांबवून ठेवते. सेल फोन जामर Device ची फ्रिक्वेन्सी इतकी मजबूत असते कि ते कोणते पण सिग्नल ला Distrube करून थांबवून ठेवते. व अश्या वेळेस Call करताना आपला Call Connect होत नाही.  

  CellPhone जामर ची रेंज :

          सेलफोन जामर ची रेंज ही ५-७ मीटर पर्यंत असते. याचा आकार हा मोबाईल एवढा पण असू शकतो किंवा एखाद्या सुटकेस पेटी येवढा पण. यामध्ये कोणते Strong सिग्नल वाले आहेत हे बघून तुम्ही याची निवड करू शकता.

      


  सेलफोन जामर कसे बनवावे :

               आताच्या Techology च्या जगात मला तर बिलकुल पण नाही वाटत कि कोणती गोष्ट अशक्य आहे. त्यातीलच एक म्हणजे सेल फोन जामर बनवावे. फक्त तुम्हाला इलेक्ट्रोनिक्स मधील Knowledge पाहिजे, खास करून तुम्हाला Oscillator, RF Amplifier (रेडीओ फ्रिक्वेन्सी), व ट्युनिंग,इत्यादी ची माहीती पाहिजे.

     (मी फक्त थोडक्यात माहीती सांगितली आहे जामर कसे बनवावे.कारण सेल फोन जामर चा उपयोग साधारण माणसाठी illegal आहे. जर का कोणी याचा उपयोग करताना सापडला तर त्याच्यावर Cyber Crime च्या गुन्ह्यात अटक पण होऊ शकते. त्यासाठी मी तुम्हाला एकाच सांगेल कि तुम्ही याचा उपयोग न केलेलाच बारा. )


चोरी झालेला मोबाईल कसा Trace करावा

शेअर मार्केट फ्री मध्ये शिकण्यासाठी क्लिक करा.



सेलफोन बनवण्यासाठी साहित्य :

1. Cellular Frequenacy Range In India (800MHZ, 900MHZ,etc


2. RF Amplifier 


3. Oscillator 


4. Tuning Circuit


5. Noise Generator 


6. Antenna


7. Batteri 


                              हे सर्व साहित्य आणल्यावर तुम्ही एक चौकोनी Aluminium चा Box बनवून ह्या मध्ये सर्व साहित्य फिट करून घ्या व याला Supply देण्यासाठी तुम्ही बाजारातून Batteri विकत घेऊ शकता. या प्रकारे तुम्ही सेल फोन जामर बनवू शकता. व हे साहित्य कसे काय जोडावे हे जर का तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही इंटरनेट वरून याचे knowledge घेऊ शकता. 

सेलफोन जामर कुठून विकत घ्यावे : 

                    जर का तुम्हाला CellPhone जामर विकत घ्यायचं असेल तर तुम्ही Online खूप Website उपलब्ध आहेत त्यावर Search करून घेऊ शकता. अन जर का तुम्हाला हे माहित नसेल कि CellPhone जामर Online विकत घेताना कोणते त्यावे तर तुम्ही Offline म्हणजेच जवळच्या इलेक्ट्रिकल्स दुकानावर जावून माहीती घेऊ शकता व तिथे उपलब्ध असेल तर तुम्ही तेथूनच विकत घेऊ शकता.

मला Instagram वर Follow  खाली माझ्या नावावर क्लिक करा 



                                            लेखक :  भुषण सावंदे

Post a Comment

1 Comments