चोरी झालेला मोबाईल कसा Trace करावा.



           चोरी झालेला मोबाईल ला करा Trace व Block 


         चोरी झालेल्या मोबाईल ला ह्या प्रकारे करा Trace 


             


ब्लॉक करण्याआधी या गोष्टीची काळाजी घ्या :


         तुम्ही लक्ष्यात ठेवा कि हि Website तुमचा IMEI नंबर ब्लॉक करण्यासाठी व अनब्लॉक करण्यासाठी तसेच Track करण्यासाठी आहे.तुम्हाला जर का तुमचा मोबाईल Track करायचा असेल तर सर्वात आधी तुम्हाला जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करावी लागेल, तक्रार केल्यास तेथून आठवणीने तक्रार नंबर घ्यायचं विसरू नये. कारण ह्या पोर्ट्रल मध्ये तक्रार नंबर टाकणे आवश्यक आहे त्या शिवाय तुम्ही तुमचा मोबाईल Trace करूही नाही शकत व ब्लॉक पण नाय करू शकत.

  IMEI No ने फोन ब्लॉक कसा करावा :

           
             आता तुम्हाला तुमचा मोबाईल शोधायचा असेल तर सर्वात आधी खाली दिलेल्या स्टेप करा. व तुम्हाला पूर्ण माहिती व्यवस्थित समजावी म्हणून मी स्क्रीनशॉट पण दिलेले आहेत.


 1. सर्वात आधी Google Crome किंवा तुमच्या मोबाईल मध्ये असलेले वेब Browser ओपन करा शक्यतो Google Crome च ओपन करावे.
         


 2. तुमच्या मोबाईल च्या Web Browser मध्ये https://ceir.gov.in/ तुम्ही हा URL पत्ता कॉपी करून पेस्ट करा. किंवा दिलेल्या लिंक वरच क्लिक करून पुढील Website मध्ये तुम्ही प्रवेश कराल.
         
          

 3. या Website मध्ये तुम्हाला तीन पर्याय दिसतील. पहिला ब्लॉक स्टोलेन किंवा लॉस्ट मोबाईल, दुसरा पर्याय म्हणजे अनब्लॉक फाउंड मोबाईल, व तिसरा पर्याय चेक रिक्वेस्ट.


 4. या तिन्ही पर्यायांपैकी तुम्हाला तुमचा मोबाईल ब्लॉक करण्यासाठी पहिल्या पर्याय वर क्लिक करावे लागेल. ब्लॉक स्टोलेन किंवा लॉस्ट मोबाईल.
             


 5. या पर्यायावर क्लिक करताच तुमच्या समोर एक लांबलचक फॉर्मे येईल जो तुम्हाला पुढील स्टेप प्रमाणे भरायचा आहे.

              


 6. आता सर्वात आधी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल ज्या चोरी झालेल्या मोबाईल मध्ये नंबर होते ते नंबर ईथे टाका. (तुमचा मोबाईल डबल सिम वाला असेल तर दोन्ही नंबर टाका अन जर का सिंगल सिम वाला असेल तर एक नंबर टाका)


 7. आता त्यानंतर तुम्हाला IMEI विचारला जाईल तर तुम्ही तुमच्या मोबाईल चा IMEI टाकावा. हा नंबर तुम्हाला तुम्ही मोबाईल घेतले असेल तेव्हा तुम्हाला Invoice मिळाले असेल त्यावर पण मिळेल. तुम्हाला तुमच्या मोबाईल चा IMEI नंबर इथे लागेलच.   
          

           (जनरल माहीतीसाठी सांगत आहे जर का तुम्हाला तुमचा IMEI माहीती करायचा असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये “ *#06# “ ह नंबर डायल करावा स्क्रीन वर तुम्हाला तुमचा IMEI नंबर मिळून जाईल.) 

        

      
          प्रत्येकाने आपला IMEI घरात कुठे एका डायरी वर लिहून ठेवावा नाहीतर Bill व्यवस्थित सांभाळून ठेवावे जेणेकरून तुमच्या वर पण जर का अशी स्थिती आली तर तुम्हाला IMEI नंबर मिळेल.


 8. IMEI नंबर टाकल्या नंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल Brand, मॉडेल Number अन तुम्ही मोबाईल विकत घेतल्याची बिल यातील मागीतलेली सर्व माहीती टाकावी लागेल.

          

 9. ही प्रोसेस झाल्यानंतर तुमचा मोबाईल कुठे चोरी झाला, किंवा हरवला कधी हरवला, कोणत्या राज्यात हरवला हि सगळी माहीती टाकावी लागेल

        ( मित्रांनो Website कोणती पण असो किंवा अप्प्लिकेशन असो हे प्रत्येक वेळेस अपडेट होत असतात त्यामुळे अस पण होऊ शकत कि मी सांगत असलेल्या माहीती हि पूर्णपणे तशीच तुम्हाला टाकावी लागेल किंवा थोडा फार Changes पण होऊ शकता याची तुम्ही दक्षता घ्यावी.)


 10. त्यानंतर तुम्ही ज्या पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली आहे आहे तेथून तुम्हाला तक्रार नंबर मिळाला असेल तर तो नंबर द्या व तक्रार अर्ज केल्यानंतर पोलिसांनी तुम्हाला दिलेली पावती इथे तुम्ही अपलोड करावी. 

             

 11. ही प्रक्रिया पूर्ण केल्या नंतर तुम्हाला तुमची माहीती मागितली जाईल म्हणजे चोरी झालेल्या मोबाईल च्या Owner ची माहीती जसे कि नाव व पूर्ण पत्ता तुम्हाला तुमचे नाव आणि पत्ता टाकल्या नंतर आयडी प्रूफ अपलोड करावा लागेल जसे कि – आधार कार्ड, Pan कार्ड,etc 

                   

 12. तिथेच खाली तुम्हाला तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर व Mail ID टाकायचा पर्याय असेल तिथे ती माहीती टाका जो मोबाईल नंबर तुम्ही टाकल त्या मोबाईल नंबर वर तुम्हाला एक OTP म्हणजेच (one time password ) येईल तो OTP तुम्ही तिथे टाका.


 13. आता तुम्हाला SMS व Mail वर रिक्वेस्ट नंबर येईल आणि तुमचा IMEI नंबर असलेला मोबाईल ब्लॉक होईल. 


 14. तुम्हाला आलेल्या रिक्वेस्ट नंबर ने तुम्ही तुमच्या मोबाईल चे स्टेटस चेक करू शकता. त्यासाठी Website च्या Home पेज वर जाऊन तिसरा पर्याय ‘स्टेट्स चेक’ इथे क्लिक करून तुम्ही स्टेटस चेक करू शकता
           



IMEI No अनब्लॉक कसा करावा :



        तुम्हाला जेव्हा तुमचा मोबाईल सापडेल तेव्हा तुम्ही ह्या पर्यायाचा वापर करून तुमचा मोबाईल ला अनब्लॉक करून वापरू शकता. 

          

             तुमचा मोबाईल अनब्लॉक करण्यासाठी Website च्या HOMEPAGE वर जाऊन दुसरा पर्याय IMEI No अनब्लॉक करण्याचा आहे तिथे तुम्ही क्लिक करून तुम्हाला आलेला रिक्वेस्ट नंबर टाकून तुमचा मोबाईल अनब्लॉक होईल व तुम्ही वापरू शकाल.

                 मित्रानो मी ही जी माहीती सांगितली आहे . ती माहीती आपल्या आयुष्यात प्रत्येकालाच कामात येणारी आहे त्यासाठी तुम्ही हि माहीती तुमचे मित्र मंडळी, नातेवाईक यांच्या मध्ये तुम्ही शेअर करू शकता त्यासाठी खाली तुम्हाला माहीती शेअर करण्यासाठी पर्याय देखील दिलेले आहेत.
    

मला Instagram वर Follow करण्यासाठी खाली माझ्या नावावर क्लिक करा.

      
                                               लेखक :  भुषण सावंदे

Post a Comment

5 Comments