साथ हवी मला तुझी
जीवनातील रहस्यमय आणि प्रेम कथा
भाग 1
संध्याकाळ झाली होती .अनिता आपल्या मुलीची वाट बघत होती .आज उशीर का झाला असेल या विचाराने तीच मन विचलित होत होते...... थोड्या वेळात तिला स्कुटीचा आवाज आला आणि तिच्या चेहऱ्यावर हसू पसरल. स्कुटी ला दाराशी लावून सत्या म्हणजे सत्यश्री आनंद देसाई घराचे दार जोर जोरात ठोकायला लागली.
सत्या : आई .....आई दार उघड ......लवकर उघड.
अनिता : अग.....थांब आले आले ......काय हि पोरगी किती वेळा सांगितले बेल वाजवत जा पण कठीण आहे .
अनिता दार उघडत बोलते.....पण दार उघडताच सत्या सरड तिच्या खोलीत जाते....
अनिता : अरे आज उशीर कसा झाला तुला .....रोज तर साडे पाच ला येते........सत्या....
अनिता सत्या शी बोलत तिच्या मागे जाते...,सत्या काहीच बोलत नसते.......तिच्या चेहर्यावर खूप राग दिसत होता . ....तिला रागाने लालबुन्द झालेलं बघून अनिता ला शंका आली.
अनिता : काय झालं सांगशील?
सत्या : माहित नाही हे मेले कधी सुधारतील....एकटी मुलगी दिसली नाही कि भेटली संधी.
अनिता : तुला त्रास दिला कोणी ...कोण होते ते .....आणि तु ठीक आहे ना फोन केला असता ना ....मला वाटलंच काहीतरी कारण असेल.
सत्या बोलता बोलता थांबली कारण अनिता तिच्या कडे संशयी नजरेने बघत होती आणि सत्या चा राग शांत झाला होउन ती मिश्किलपणे आईकडे बघत होती.
अनिता : नाहीतर......तु काय मारलं वैगेरे तर नाहीना त्यांना.......अरे काय करू मी तुझं सत्या.....जेव्हा बघा दुसऱ्यांच्या भानगडीत पडते . यासाठी मी यांना म्हणतेय करून टाका लग्न ...
सत्या : आई.....बाबांना काय गरज लग्न करायची.....तु आहेना.
सत्या मस्करी करून आईला शांत करायचा प्रयत्न करते
अनिता : सत्या तु......ना.....मार खाशील माझ्या हातून.
सत्या : हो खाईल माते....पण त्या आधी जेवण दे खूप भूक लागली आहे ग.
अनिता : हो लागलीच असेल ....त्या मुलांना मारण्यात जिरवलंं असेल ना.....ये हाथ पाय धुवून वाढायला घेते.
तसे पण तुझे बाबा आज उशिरा येणार आहे.
अनिता किचन मध्ये आवरायला गेल्या ......आणि सत्या फ्रेश होऊन आली आणि तिला खरचटले होते तिथे anticeptic लावायला लागली.
अनिता आणि सत्या जेवायला बसले होते.......
अनिता : हो....मग
सत्या : मग काय तु मला सांगितलंच नाय लग्न कुठे आहे ......म्हणजे दीदी म्हणे जीजूच्या गावी होणार आहे पण तिला गावाकडे नाही करायचं असं ती बोलली.
अनिता : हो ग गावाकडेच होणार आहे लग्न मुलाचे मोठे काका नाही म्हणत आहे शहरांत लग्नाच...
सत्या : त्यांना काय problem ......त्याच थोडीच लग्न आहे.....लग्न आहे कुणाच आणि निर्णय घेते कोण ....काहीही
अनिता : सत्य्या.....घरातील मोठे जे ठरवतात त्याला मान द्यायचा असतो बेटा....लग्न फक्त दोन जीवांना नाही तर दोन कुटुंबांना जोडत .
सत्या : ओक्के ....सोड तु मला परत एक व्याख्यान देऊन टाकशील .....जाऊदे....मी नाही येणार हा पण लग्नाला.
अनिता : का?.....का नाही येणार तु.....यावच लागेल ....नाहीतर तुझ्या लग्नात कोणीच येणार नाही.
सत्या : चालेल ना तुमचा खर्च वाचेल.
अनिता :सत्या नाटकी नकोय मला ....तुझ्या बाबांनी तिकिट बुक केली आहे......आणि तु नाही आली तर सुमी ला कसं वाटेल.
सत्या काही वेळ शांत बसते.......आणि मग बोलते
सत्या : हम्म ठीके.....पण मला तु टोकनार नाही....म्हणजे असं कर तस नको करू असं.....चालेल
अनिता : हम्म फक्त तुझ्या काही खुराफती तिथे नको करू....माझी लाज ठेवशील तिथे काही.....बस येवढ जमेल तर कर.
सत्या : तु टेन्शन नको घेऊ आई ...मी तुला काहीच टेन्शन नाही देणार.
अनिता : हम्म जेव आणि झोप आता.
जेवणं आटोपुन सत्या झोपायला गेली.....झोप लागत होती तोच तिला आठवलं कि तिने गावाचं नाव तर विचारलंच नाही ...दीदी बोलली होती सर्व फ्रेंड्स ला पण घेऊन ये कामात मदत होईल.उद्या आई ला विचारते ,सकाळी तर ती पूजेत असणार ....हा match खेळून घरी आली कि विचारते......असा विचार करत सत्या झोपी गेली.
सकाळी सत्या लवकर उठते कारण आज तिची match असते क्रिकेट ची.लवकर आवरून ती match साठी निघून जाते.......टीव्ही चा आवाज मोठा करून आनंद म्हणजेच सत्या चे वडील news पेपर वाचत होते. सत्या ची आई त्यांच्यावर राग राग करत नाश्ता बनवत असतें.
अनिता : काय कराव देवा सकाळी पूजा करू म्हटलं शांततेत तर साहेबांच्या बातम्या महत्वाच्या .....देव धर्म काही पाडू नाही फक्त उठल सुठल कि त्या डब्ब्याच्या समोर बसायच ......देवाला नमस्कार काही भाव नाही....फक्त त्या बातम्याच्या कटकटी आणि हातात पेपर.....मग तर खायला पण विनंती करावी लागते.
......अहो ऐकत आहे ना मी तुम्हांला म्हणतेय .....या नाश्ता करायला कि आज की राज खबर नेच पोट भरले.
आनंद : हो ग काय तु पण आरामात पेपर पण वाचू देत नाही .तुला माहिती आहे काय बातमी आली आज....
आनंद च बोलणं मधेच थांबवत अनिता बोलते....
अनिता : नाही माहित आणि सांगा पण नको....घरात काय कमी टेन्शन आहे का? कि आता त्या बातम्यांच पण घेऊ.
आनंद : घरात काय टेन्शन आहे......समजलं सत्या कुठे आहे ....उठली नाय अजून ...
अनिता : हो उठली आहे ना कालचे पराक्रम करून दमली होती.....आवाज देऊन घसा बसला असता पण हि कार्टी उठली नसती....पण देव कृपा जे आज तिची match आहे .म्हणून लवकर उठली.
आनंद अनिताच बोलणं ऐकून हसू लागले
आनंद : आता काय केलं माझ्या सत्तू ने मलाही कळू दे.
अनिता : काय केलं ....कोण्या गुंड मुलांना मारलं तिने काल.......
आनंद : कारण असेल त्या मागे..... त्या शिवाय नाही असं करणार ती.
अनिता : हो एका मुलीला त्रास देत होते.....म्हणून....पण मग आपण कशाला असं दुसऱ्याच्या भानगडीत पडायला ....उगाच काही त्रास झाला पुढे तर...
आनंद : अनिता माझ्या सत्तू ने जे केलं ते बरोबर होत ....एका मुलीला त्रास देत होते ते....आणि मी सत्तू ला कराटे क्लास यासाठी लावला होते कि ती स्वतःची रक्षा करण्यास कुणावर अवलंबून राहू नये...आणि त्यात जर ती एका असहाय मुलीची मदत करते तर त्यात वाईट काय आणि तु विसरते ती कुणाची मुलगी आहे ते.
अनिता : मला नाही माहीत काहीच ....मला फक्त माझ्या मुलीची काळजी आहे......बाकी मला कुणाशी काही घेणं देणं नाही.
आनंद : तु उगाच तीच टेन्शन घेतेय ....ती खूप समझदार आहे.....नकोस काळजी करू....आणि हो तिला सांगितलं ना कि लग्नाला गावी जायचय .
अनिता : हो सांगितलंय पण............ त्या गावला जाणे म्हणजे......त्या गावी पुन्हा .....मला खूप भीती वाटतेय जर त्या लोकांना समजलं तर .त्या दोन गावानं मध्ये जे वाद आहेत ते कोणामुळे आहेत माहित आहे ना तरीही तुम्ही नाही ऐकणार
आनंद : शांत हो आपण जसे विचार करतो तसेच होते....म्हणून सकारात्मक विचार कर.....
अनिता : ह्म्म....खरं आहे तुमचं .पण भीती आहे फक्त त्या माणसाची ...
आनंद : तो काहीही नाही करू शकत ....तस हि तो कुठे ओळखतो आपल्याला आणि सत्या तर लहान होती तेव्हा ....नको विचार करू.....आपण त्याला ओळखतो पण तो नाही.....so dont worry...
अनिता : ठीक आहे जसं तुम्हाला योग्य वाटेल.
__________
क्रिकेट चे मैदान
सत्या बॅटिंग करत होती लास्ट ओव्हर चे फक्त 2 ball बाकी होते आणि तिला 4 रन जिंकन्यासाठी हवे होते.............तिची सह खेळाडू प्रिया आणि योजना आखत होत्या........सत्या वर दबाव आला होता कारण match ला जिन्कने आता संपूर्ण तिच्या खेळी वर अवलंबून होते आणि ती टीम ची कॅप्टन होती म्हणून तिला कोणत्याही परिस्तिथी मध्ये तिला 4 रन काढायचे होते........सत्या ने तिची position घेतली ready आहे असा इशारा केला.......बॉल जे हवेत गेलात सत्याच पूर्ण लक्ष त्या बॉल वर केंद्रित झालं आणि केव्हाच तिने आपल्या bat ने बॉल हवेत उडवला......आणि सर्वांच्या नजरा बॉल वर गेल्या आणि बॉल boundary च्या बाहेर.....आणि मोठा टाळ्यांचा कडकडात आवाज झाला .......सत्या ची टीम जिंकली होती....टीम मधल्या मुलींनी तिला उचलून घेतले........सर्व सत्या सत्या नावाने ओरडत होते.................आणि या सर्वात दुर कुणीतरी होत ........जी व्यक्ती सत्या चे फोटो घेत होती ...........ती व्यक्ती सत्या च्या फोटो कडे बघून किंचित हसली .....लवकरच भेट होईल आपली मिस सत्यश्री आनंद देसाई असं म्हणत एक नजर सत्या वर टाकून जाऊ लागली
.....तेव्हड्यात सत्या ची नजर त्या व्यक्ती वर पडली,क्षणभर स्थिरावली आणि पुन्हा ती जल्लोषात मिसळली
__________
..........
.......हॅलो
........काम झालं का?
........हो साहेब झालंय ,तुम्ही सांगितल्या प्रमाणे आम्ही लक्ष ठेवून आहोत त्यांच्यावर.
.......नीट लक्ष द्या आणि ....
........साहेब तुम्ही काळजी नका करू आम्ही आमचं कामं नीट करतोय.
.......तरीही सांभाळून ती खूप हुशार आहे.
......हो साहेब आम्ही काळजी पूर्वक हाताळतोय सर्व.
......हम्म ठीके .
......चालेल साहेब ठेवतो.
.....हो
____________



2 Comments
So exciting, interesting n clear
ReplyDeleteThank you 😊 🙏
Delete