वाचाकांहो प्रत्येक वर्षी डिसेंबर महिना जवळ आला कि आपण बघतो जवळ-जवळ सर्वच समाज माध्यमांमध्ये इन्कमटॅक्स बद्दल चर्चा चालू असते. कोणी म्हणत कि मला रीटर्न फाईल भरायची आहे, तर कोणी म्हणत की फॉर्म नं १६ माझा भरायचा बाकी आहे. पण खूप लोक असे आहेत त्यांना अजून इन्कमटॅक्स बद्दल काहीच माहीती नसते, तर अश्या लोकांसाठी ही माहीती खूप कामाची येणार आहे. कारण ह्या पोस्ट मध्ये इन्कमटॅक्स बद्दल माहीती तुम्हाला मी इथे देण्याचा प्रयत्न करत आहे.
वाचकहो प्रत्येक आर्थिक वर्षाची Tax ची गणना ही स्वतः कर्मचारी पण करू शकतो, जर कर्मचाऱ्याला शक्य नसेल तर तो Income Tax चे संपूर्ण नॉलेज असलेल्या किंवा C.A कडे जाऊन पण Tax ची गणना करू शकतो.
पगारदार कर्मचाऱ्याच्या पगारातून Advance मध्ये Tax कपात करण्याची जबाबदारी हि पगार देणाऱ्या आस्थापानाची (मालकाची) असते, जर पगार देणाऱ्या आस्थापाकाने असा Tax कपात केला नसेल किंवा करत नसेल तर कर्मचारी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन 280 नंबर च्या चलनाद्वारे Advance मध्ये टॅक्स भरू शकतो.
फॉर्म 16A आणि फॉर्म 16B देण्याची जबाबदारी ही कार्यालय प्रमुखाची असते. कार्यालयाने प्रामुख्याने Tracess या Incometax Department च्या वेबसाईट वरून फॉर्म 16A आणि फॉर्म 16B कर्मचाऱ्याला देणे बंधनकारक आहे.
TDS म्हणजे T – Tax, D – Deduction, S – Source. याचे प्रमाण पत्र संबंधित कर्मचाऱ्याच्या नावे स्वतःचा Tax आपल्या Pan No वर जमा झाल्याची पावती असते. म्हणजेच T.D.S आपणास लागलेला Tax आपल्या Pan No वर जमा झाला नसेल, तर त्याची Recovery व्याजासह काही वर्षांनी निघते. आपला कपात केलेला आयकर T.D.S रीटर्नद्वारा जमा करण्याची जबाबदारी कार्यालयाची असते. T.D.S रीटर्न भरण्याची जबाबदारी कार्यालयातील लेखा विभागातील कर्मचारी यांची पण असते.
कार्यालय या कामासाठी इन्कमटॅक्स चे चांगले नॉलेज असलेल्या किंवा C.A ची मदत घेऊ शकतो. त्यासाठीचा येणारा सर्व खर्च कार्यालय आपल्या निधीतून करू शकते. TDS साठीचा येणारा खर्च हा कर्मचारी यांच्याकडून वसूल केला जाऊ नाही शकत आपला पगारामधून कपात झालेला Tax हा आपल्या Pan वर दिसत नसेल, तर आपण कार्यालय प्रमुखाकडे याबाबत विचारणा करू शकतो. वरिष्ठांना आणि इन्कमटॅक्स विभागाकडे तक्रार देखील करू शकतो. TDS पगारामधून कपात केलेला Tax जमा झाला नसेल, तर वैयक्तिक रीटर्न भरण्यासाठी अडचण देखील येऊ शकते. त्यामुळे आपण इन्कमटॅक्स च्या वेबसाईट वर जाऊन तुमचे अकाऊंट लॉग इन करून 26AS चा फॉर्म वारंवार चेक करत राहावे.
ह्या वर्षी बदल फक्त फॉर्म नं 16 मध्ये झाला आहे. हा फॉर्म भरताना तुम्हाला थोडी काळजी घ्यावी लागणार आहे, ती म्हणजे फॉर्म भरताना सरकारने ‘Old Regime’ आणि ‘New Regime’ असे दोन पर्याय दिले आहेत. त्यामुळे कोणत्या पर्यायामधून आपल्याला कमी Tax लागेल हे बघूनच योग्य पर्याय इथे तुम्हाला निवडावा लागेल बाकी पूर्ण प्रक्रिया आधी सारखीच आहे.
A.Old Regime हा पर्याय जर तुम्ही निवडला तर यामध्ये तुमच्या एकूण उत्पन्नातून ५०,००० हजार Standard Deduction, व्यवसाय कर, गृहकर्ज व्याज व सेक्शन 80c अंतर्गत (जीपीएफ, गटविमा, एल आयसी, गृहकर्ज मुद्दल, ट्युशन फीस) १५००००० रु /- एवढी सूट मिळणार आहे.
जरी इतकी सूट मिळत आहे, परंतु या Old Regime मध्ये टॅक्सदर जास्त आहे तो पुढीलप्रमाणे बघावा,
अडीच लाख पर्यंत – 0%
अडीच लाख ते पाच लाख – 05%
पाच लाख ते दहा लाख – 20%
दहा लाखचे वर – 30%
अशा प्रकारे टॅक्स बसणार आहे. आणि वजावटी जाता करपात्र उत्पन्न पाच लाख चे आत असेल, तर बसलेल्या टॅक्स मधून सेक्शन 87A अंतर्गत १२५०० ची सूट मिळणार आहे
B.New Regime हा नवीन पर्याय निवडला तर Standards Deduction, व्यवसाय कर, गृहकर्ज व्याज, एलआयसी यांना बचतीचा कोणताही लाभ किंवा सूट मिळणार नाही. परंतु यामध्ये टॅक्स रेट थोडे कमी आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत.
अडीच लाख पर्यंत – 0%
अडीच लाख ते पाच लाख – 05%
पाच लाख ते साडेसात लाख – 10%
साडेसात लाख ते दहा लाख – 15%
दहा लाख ते साडेबारा लाख – 20%
साडेबारा लाख ते पंधरा लाख – 25%
अश्या पद्धतीने दोन्ही प्रकारे तुम्ही कॅक्युलेशन करून जो पर्याय तुम्हाला योग्य वाटेल तो निवडावा. यामध्ये काहीना Old Regime तर काहीना New Regime फायद्याची नक्कीच ठरेल. या दोन्ही पर्यायांमध्ये बसलेल्या टॅक्सवर मागीलवर्षी प्रमाणेच 4% शिक्षण व आरोग्य उप कर लागणार आहे.
तर वाचाकानो ही माहीती तुम्हाला नक्कीच कामात येईल अन तुमच्या सर्कल मध्ये जर अशी कोणती व्यक्ती असेल जिला इन्कमटॅक्स बद्दल जाणून घ्यायचे असेल, तर तुम्ही अश्या व्यक्तीला आपल्या वेबसाईट ची लिंक देऊन ही माहिती नक्कीच शेअर करा. जेणेकरून त्यांना पण ह्या माहितीचा फायदा होईल.
अन हो ही पोस्ट Guest Post आहे. एका Guest ने सेंड केली मला. जर का तुमच्याकडे पण अश्या प्रकारच्या माहीती असतील अन तुम्हाला त्या माहीती Publish करायची इच्छा असेल तर तुम्ही ती माहीती आमच्या कडे Guest Post ह्या इथे क्लिक करून पोहचवू शकता, जर का आम्हला तुमची पोस्ट योग्य वाटली आमच्या वेबसाईट वर पब्लिश करण्यासाठी तर आम्ही नक्की पब्लिश करू
Guest Post Send करण्यासाठी इथे क्लिक करा – Click Here
2 Comments
nice a great Information Provide
ReplyDeleteThanks
Delete